Home | बिझनेस | बीएमडब्लू कडून ऑनलाइन आणि ऑफलाइन संवादासाठी जस्ट कान्ट वेट मोहिमेसह ब्रँड डिझाइनचे अनावरण

बीएमडब्लू कडून ऑनलाइन आणि ऑफलाइन संवादासाठी जस्ट कान्ट वेट मोहिमेसह ब्रँड डिझाइनचे अनावरण

BMW Just Cant Wait

बीएमडब्लू ग्रुपने भारतातील आपल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संवादासाठी नवीन ब्रँड आणि कॉर्पोरेट ओळखीची घोषणा केली आहे. बीएमडब्लू, बीएमडब्लू आय आणि बीएमडब्लू एम कम्युनिकेशन लोगो यांच्यावर पूर्णपणे नव्याने काम करण्यात आले आहे, एक नवीन लोगोटाइप आणि नवीन डिझाइन तत्वही आणण्यात आली आहे. 

बीएमडब्लू ब्रँड आजच्या काळातील अपेक्षा व दृश्य शैली पूर्ण करतो आणि डिजिटल युगासाठी तो पूर्णपणे सुयोग्य आहे. 

बीएमडब्लू ग्रुप इंडियाने आपल्या ग्राहकांना घरीच सेवा देण्यासाठी नवीन युगाच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या सर्व बाबींचा विचार केला आहे. #जस्ट काांट वेेेट मोहिमेतून ब्रँडची सकारात्मकता, ग्राहकाभिमुखता यांच्यावर भर दिला जाते आणि आपल्या ग्राहकांना आनंद देण्यावर ते सातत्याने काम करतात. ग्राहक, त्यांची गाडी आणि ‘शीअर ड्रायव्हिंग प्लेझरची’ इच्छा यांच्यामधील एक खास नाते असते.

अरलिंदो टेक्सेरिया, कार्यकारी अध्यक्ष, बीएमडब्लू ग्रुप इंडिया म्हणाले की, “बीएमडब्लू ने कायमच आपल्या प्रतिष्ठित ग्राहकांसोबतचे आपले नाते जोपासले आहे आणि नावीन्यपूर्ण उत्पादने व मूल्यवर्धित सेवा बाजारात आणल्या आहेत. हा नवीन ब्रँड डिझाइन आणि लोगो खुलेपणा व सुस्पष्टता यांचे प्रतीक आहे. त्यातून ब्रँडचे महत्त्व आणि भविष्यातील मोबिलिटी तसेच ड्रायव्हिंगची सुसंगतता स्पष्ट होते. बीएमडब्लू ग्रुप इंडिया डिजिटलायझेशनची आव्हाने आणि संधी यांच्यासाठी सुसज्ज आहे. आम्ही सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आमच्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे नवीन कॅम्पेन नवीन लोगोचा वापर करून बनवण्यात आले आहे आणि आमच्या ग्राहकांना संपूर्ण आनंद देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे.” अशी माहिती त्यांनी दिली

लोगोची अतिरिक्त पारदर्शक आवृत्ती ही ग्राहकांना बी एम डब्लू च्या जगात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण आहे. या बदलातून पूर्णपणे ऑटोमोटिव्ह जगावर लक्ष केंद्रित करण्यावरून बी एम डब्लूचे रूपांतरण तंत्रज्ञान आणि संपर्क यांच्याशी संबंधित असल्याचे सांगते. 

बी एम डब्लू चा नवीन लुक डिजिटलायझेशनची आव्हाने आणि संधींच्या दिशेने जाणारा आहे. नव्याने डिझाइन केलेला लोगो खुलेपणा आणि एका व्यक्तिरेखेची शक्ती दर्शवतो, ज्यातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारांमध्ये समकालीन, भविष्यासाठी सुसंगत अस्तित्व दिसून येते.