Home | बिझनेस | डिअ‍ॅजिओ इंडिया च्या ‘रेझिंग द बार’ मधून बार्स, पब्स आणि रेस्टॉरंटना पाठबळ 

डिअ‍ॅजिओ इंडिया च्या ‘रेझिंग द बार’ मधून बार्स, पब्स आणि रेस्टॉरंटना पाठबळ 

Diageo india raising the bar

डिअ‍ॅजिओ इंडियातर्फे  ‘रेझिंग द बार’ हा 75 कोटी रुपयांचा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. मद्य पुरवणार्‍या बार्स, पब्स आणि रेस्टॉरंटना कोविड-19 च्या संकटकाळातील परिणामांमधून बाहेर पडण्यास आणि ग्राहकांचे पुन्हा स्वागत करण्यास या उपक्रमातून साह्य केले जाणार आहे. रेझिंग द बार या दोन वर्षांच्या कार्यक्रमातून नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि इतर शहरांमधील मद्य पुरवणार्‍या पात्र बार्स, पब्स आणि रेस्तराँना पुनरुज्जीवन आणि नव्या जोमाने पुन्हा उभे राहण्यासाठी सहाय्य दिले जाणार आहे.

जागतिक स्तरावर बार मालकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे डिअ‍ॅजिओतर्फे ’रेझिंग द बार’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. या आस्थापना पुन्हा सुरू करताना स्वच्छता उपाययोजना, डिजिटल साहाय्य आणि व्यवहार्य साधने, प्रशिक्षण या मुद्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.  

‘रेझिंग द बार’ उपक्रमात रोख रकमेव्यतिरिक्तचे साहाय्य दिले जाणार आहे. यात उच्च दर्जाच्या सॅनिटायझर डिस्पेन्सर्ससहित हायजिन किट्स, वैद्यकीय दर्जाचे हँड सॅनिटायझर्स आणि इतर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (मास्क आणि ग्लव्हज) यासारखी व्यवहार्य साधने  तसेच मद्य पुरवणार्‍या बार्सना आरक्षण आणि कॅशलेस पेमेंटसाठी भागीदारी करण्यात सहाय्य करणे, मोबाइल बार्स आणि आऊटडोअर साधने अशा प्रकारे विविध प्रकारचे साहाय्य केले जाणार आहे.

बार मालकांना नियमितपणे प्राथमिक पद्धतींचे प्रशिक्षण आणि स्रोतांची माहिती पुरवली जाईल. तसेच व्यवसाय पुन्हा सुरू करताना त्यांचा अनुभव जागतिक सर्वेक्षणात मांडता येईल.

या सादरीकरणाबद्दल डिअ‍ॅजिओचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू म्हणाले,  की भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला प्रचंड महसुल तोटा सहन करावा लागला आहे. अनेक स्टार्ट-अप्स आणि लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. पब्स, बार्स आणि रेस्टॉरंट आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. 

या क्षेत्राचे पुनरुज्जीवन अर्थव्यवस्थेसाठी आणि आपल्या व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आणि तेथील रोजगार पुनरुज्जीवित होईल आणि ग्राहकांना पुन्हा एकदा सामाजिक स्तरावर मिळून मिसळून सामान्य आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास प्राप्त होईल.

भारतात हा उपक्रम ब्लॅक डॉग या आमच्या स्थानिक पातळीवर ब्लेंड केलेल्या ख्यातनाम स्कॉच व्हिस्कीच्या मालकीचा असेल आणि ते त्याचे प्रतिनिधीत्व करतील. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पहले इंडिया फाऊंडेशनच्या अहवालानुसार भारतीय रेसटॉरंट क्षेत्र हे सेवा क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 2.1 टक्के आहे. 30 अब्ज रुपये (426 दशलक्ष डॉलर्स) उलाढालीचे हे क्षेत्र 2021 पर्यंत 10 टक्के वाढीसह 50 अब्ज रुपये (710 दशलक्ष डॉलर्स) पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. इतकेच नाही, सरकारी महसुलात या क्षेत्राकडून 24 अब्ज रुपये (340 दशलक्ष डॉलर्स)ची भर पडते आणि यात 7.2 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

कोविड-19 मुळे देशभरातील आस्थापने बंद झाल्याने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर व्यापक परिणाम झाला आहे. अनेक स्टार्ट-अप्सना सामावून घेणारे हे क्षेत्र लॉकडाऊन, भाड्याची मोठी रक्कम यामुळे खेळत्या भांडवलाची मोठी समस्या सध्या अनुभवत आहे. सरकार आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करत असताना लोकांना पुन्हा एकदा आपल्या समुदायांसोबत एकत्र यायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट पद्धती, मोफत डिजिटल सहाय्य, तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि साधने पुरवून डिअ‍ॅजिओ भारतातील मद्य पुरवणार्‍या बार्स, पब्स आणि रॅस्टॉरंट्सना आपली दारे पुन्हा खुली करण्यासाठी मदत करणार आहे.

‘रेझिंग द बार’ उपक्रमातून साह्य मिळवण्यासाठी आस्थापनांनी प्रत्येक विभागात कायदेशीर आस्थापना (करांसाठी) किंवा समतूल्य म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.  कोविड-19 मुळे राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी किमान 12 महिने त्यांनी सुरुवात केलेली असावी, सामान्य पद्धतीने व्यवसाय करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर त्यामुळे परिणाम झालेला असावा. त्यांच्याकडे मद्यविक्रीचा परवाना असावा. आपल्या समुदायामध्ये ’रेझ द बार’ साठी किमान एखादा मार्ग किंवा योजना त्यांनी मांडावी.