Home | बिझनेस | गोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे – डॉ प्रमोद सावंत

गोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे – डॉ प्रमोद सावंत

Dr Pramod Sawant

कोविड १९ साथीच्या रोगाचा परिणाम राज्यातील सर्वच क्षेत्रावर झाला असून यातून व्यवसाय क्षेत्र अलिप्त राहिले नाही खाजगी आणि लघु उद्योगांनाही याची झळ बसली आहे. अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी सरकार आपल्या विविध योजनांद्वारे मार्गदर्शन देत आहे. गोवा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज विस्ताराने समजण्यासाठी बीएनआयने अलीकडेच ‘गोव्यातील एमएसएमईला डीकोडिंग फायनान्सियल सपोर्ट ‘ या विषयावर एक वेबिनार आयोजित केले होते. गोव्यातील व्यवसाय आणि विविध योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून मुख्यमंत्र्यांनी २० कोटी रुपये खर्च केले. 

हा वेबिनार हा दोन भागांत पार पडला. पहिल्या भागामध्ये बौद्धिक पॅनेल चर्चेचा समावेश होता. ज्यात श्री. शिरीष कोतमिरे यांनी निधीच्या स्रोताबद्दल स्पष्टीकरण दिले तसेच एमएसएमई निश्चित खर्च कमी करून कसा पुढे जाऊ शकतो याविषयी माहिती दिली.

इग्रेडीएटोर हेमल खंडवाला यांनी खर्च कपातसाठीची माहिती यावेळी दिली. एमएसएमईसाठी २० कोटी पॅकेज घेऊन सरकारने राखून ठेवलेल्या शिल्लकचीही प्रशंसा केली कारण ती तारण नसलेल्या निधीतून आणि कमी व्याज दरावर मिळू शकली आहे. उद्योग संचालनालय, गोवा सरकारच्या गीता जोशी यांनी यावेळी लघु उद्योगांना द्याव्या लागणाऱ्या प्रोत्साहनांविषयी बोलल्या आणि या योजना गोवा एमएसएमईसाठी गोवा सरकारकडून उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद अन्वेकर यांनी गोवा सरकारच्या आयटी धोरण व योजनांविषयी माहिती दिली. पॉलिसीतील एकूण 19 योजनांवर यावेळी माहिती देत प्रकाश टाकण्यात आला, ज्याचा फायदा कंपन्यांना होऊ शकेल. धोरणात्मक अंमलबजावणीसाठी आयटी उद्योग जोरदार प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनात मदत करण्यासाठी आयटी हे मुख्य क्षेत्रांपैकी एक असल्याचे जाहीर केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या वेबिनारचे मुख्य वक्ते म्हणजेच पुणे प्रादेशिक कार्यालयातील लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अजित नाथ झा होते. “एमएसएमईमध्ये सिडबी’साठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बीएनआय गोवा यांचा अत्यंत आभारी आहे. एमएसएमईचे सक्षमीकरण करणे हे सिडबीचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि सध्याच्या गंभीर परिस्थितीत आम्ही एसपीइइडीसारख्या आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्कृष्ट सहाय्य देण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्यामुळे एंटरप्राइझच्या विकासासाठी उपकरणे खरेदीसाठी कर्ज उपलब्ध आहे तसेच प्रथम हे सुरक्षितता मॉडेल असून रूफटॉप सोलर पीव्ही इ नाथ झा यांच्या पॅनेलसमवेत संभाषणात होते. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमएसएमईसाठी राज्य सरकारने राबविलेली विविध धोरणे आणि योजनांची सखोल माहिती दिली. आयटी उद्योगाच्या संदर्भात कोविडनंतरच्या काळात या उद्योगास विस्तृत महत्व असून या उद्योगात वाढ होऊ शकत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी आत्मनिभार भारत पॅकेजबद्दलही माहिती दिली या पॅकेजच्या सेवा कशा मिळू शकतात यावर लक्ष देण्याचे आवाहन केले. ज्या उद्योग व व्यवसायांनी कर्मचाऱ्यांना कमी केले नाही किंवा वेतन दिले त्यांचेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आभार मानले. 

स्टार्टअप पॉलिसींबद्दल नमूद करताना ते खासगी विद्यापीठांना राज्यात काम करण्यास परवानगी देण्याविषयी आणि खासगी विद्यापीठांचे विधेयक मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले. अशा जागरूकता पुढाकारातून उद्योजकांना सहाय्य करण्याच्या कामासाठी बीएनआयच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. राजकुमार कामत यांनी या योजनांच्या माध्यमातून या सदस्यांना पाठबळ देण्यासाठी एक टीम स्थापन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. राजकुमार कामत यांच्या विनंतीवरून माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील रोजगार सबसिडी योजना सर्व्हिस एंटरप्राईजेसपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

कोविडनंतर आत्मनिर्भर भारत म्हणून विचार करतांना आपण गोवेकरांनी स्वयंपूर्ण होण्याबाबतही विचार करायला हवा. आतापर्यंत, गोवा एक राज्य म्हणून विविध कारणांसाठी इतर राज्यावर अवलंबून होते. गोव्याच्या मनुष्यबळाच्या वापराविषयी विचार करतांना गोव्याची इको सिस्टीम लक्षात घेण्याची गरज आहे. उद्योजकांनी आपल्या सध्याच्या आणि नजीकच्या भविष्यातील गरजेबद्दल विचार करणे महत्वाचे आहे. गोव्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनाबाबतीत सूचनांचे मी कौतुक करतो आणि त्यांचे स्वागत करतो आणि त्याद्वारे आपल्या गोव्याला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जाऊया, ”असा संदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीय जनतेला दिला. 

1 thought on “गोमंतकीयांच्यात असणाऱ्या कौशल्यांना योग्य पद्धतीने दिशा देण्याची वेळ आली आहे – डॉ प्रमोद सावंत”

Comments are closed.