Home | बिझनेस | मारुती सुझुकी रीवॉर्ड्स : ग्राहकांसाठी अनोखा सर्वसमावेशक लॉयल्टी रीवॉर्ड 

मारुती सुझुकी रीवॉर्ड्स : ग्राहकांसाठी अनोखा सर्वसमावेशक लॉयल्टी रीवॉर्ड 

Maruti Suzuki Royalty Rewards

मारुती सुझुकी इंडियाने मारुती सुझुकी रीवॉर्ड्स हा अनोखा लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून यात अरेना, नेक्सा आणि ट्रू व्हॅल्यू आऊटलेट्समधील सर्व प्रवासी वाहनांच्या ग्राहकांना लाभ मिळणार आहेत. मारुती सुझुकी रीवॉर्ड या सर्वसमावेशक उपक्रमात अतिरिक्त गाडी खरेदी, सर्विस, मारुती इन्शुरन्स, अ‍ॅक्सेसरीज आणि कंपनीसोबतचे इतर अनेक संबंधित लाभ ग्राहकांना मिळतील.

या उपक्रमाबद्दल मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा म्हणाले, की मारुती सुझुकी रीवॉर्ड्समुळे ग्राहकांना आनंददायी सेवा देण्याची आमची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नव्या लॉयल्टी प्रोग्राममुळे ही बांधिलकी पुढच्या टप्प्यावर गेली आहे आणि त्यातून काही अत्यंत उत्कृष्ट लाभ मिळतील. यातून सदस्यांना त्यांच्या सोयीनुसार या सुविधांचा लाभ घेत अनोखे फायदे मिळवण्यासाठी लॉयल्टी प्रोग्राममध्ये पुढे जाता येईल. 

भारतभरातील सर्व मारुती सुझुकी डीलरशीप्समध्ये मारुती सुझुकी रीवॉर्ड प्रोग्रामचे लाभ घेता येतील. वाहनाची सर्विस, अ‍ॅक्सेसरीजची खरेदी, अस्सल सुटे भाग, वॉरंटी आणि इन्शुरन्सचा कालावधी वाढवणे आणि आमच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश यासाठी हे रीवॉर्ड्स वापरता येतील.

ग्राहकांना आता मारुती सुझुकी रीवॉर्ड्स वेबसाइटच्या डिजिटल माध्यमातून कार्ड-लेस प्रोग्रामचा अनुभव घेता येईल आणि सुझुकीच्या प्रत्येक संपर्क आणि व्यवहारातून आपले रीवॉर्ड्स पॉईंट वाढताना पाहता येतील. या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना चार टप्प्यांमध्ये विभागले जाईल – सदस्य, सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम. या सुविधेमुळे मारुती सुझुकीसोबतचे संबंध ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर ठरतील आणि त्यांना खास इव्हेंट आणि ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होईल. 

या काळात ऑटोकार्ड आणि मायनेक्सा या सध्याच्या उपक्रमांमधील सदस्यांना नव्या मारुती सुझुकी रीवॉर्ड्समध्ये सहभागी करून घेतले जाईल. या अपग्रेड प्रक्रियेसाठी कोणतीही अतिरिक्त फी घेतली जाणार नाही आणि आधीच्या उपक्रमातील पॉईंट मूल्य शिल्लक पुढे वापरले जातील.

हा कार्ड-लेस उपक्रम असल्याने सर्व माहिती आणि व्यवहारांचे अलर्ट ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर डिजिटली पाठवले जातील. मारुती सुझुकी रीवॉर्ड्समध्ये नक्की नोंदणी करा, असे आवाहन मारुती सुझुकीने केले आहे. 

1 thought on “मारुती सुझुकी रीवॉर्ड्स : ग्राहकांसाठी अनोखा सर्वसमावेशक लॉयल्टी रीवॉर्ड ”

Comments are closed.