Home | बिझनेस | जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच

जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात लाँच

"ohh idly" India's first  non veg! Launched in Goa

भारतातील पहिली मांसाहारी ‘ओह इडली’ गोव्यात जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे लाँच करण्यात आली. आम्ही गोव्यात पहिल्यांदाच मांसाहारी इडली लाँच करत आहोत. हे लाँचिंग जिएसबी रिसर्च अँड कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ गौरब सरकार,ओह इडलीच्या गार्गी चौधरी तसेच योगेश नाईक आणि शेफ सुनीत शर्मा यांच्या हस्ते गोवा मॅरीअट रिसॉर्ट अँड स्पा येथे करण्यात आले.

याविषयी बोलताना जिएसबीचे सीईओ गौरब सरकार म्हणाले की “आम्हाला सहकार्य केल्याबद्दल ‘ओह लेडी’ आणि जिएसबी हे शेफ सुनित शर्मा,योगेश नाईक आणि गोवा सरकारचे आभारी आहोत.” या उत्पादनाचे महत्व ओळखून ते बाजारात लाँच करण्यात गौरब सरकार यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

जिएसबी यांनी कोविड काळात गोव्यातील ‘ओह इडली’च्या  स्त्री उद्योजिका गार्गी चौधरी यांचे सशक्तीकरण केले असून ‘ओह इडली’साठी गुंतवणूकदार शोधले आहेत. तसेच त्यांनी फ्रांचाईझी मॉडेलचा वापर करून गोव्याच्या मिश्र संस्कृतीपर्यंत ‘ओह इडली’ चा व्यापार पोहोचवण्यासाठी, वाढविण्यासाठी मदत केली आहे.

याविषयी बोलताना जिएसबीचे सीईओ गौरब सरकार “म्हणाले की ज्या गोवन स्टार्टअपना मोठे व्हायचे आहे अशा  सर्व स्टार्टअपचे आम्ही स्वागत करतो.”

याविषयी बोलताना ‘ओह इडली’च्या गार्गी चौधरी म्हणाल्या की “सध्याच्या डिजिटल युगात तसेच कोविड परिस्थितीत क्लाउड किचनचे महत्व वाढले आहे.लोक घरातून फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून आमचे अन्नपदार्थ मागवू शकतात.आमचे बेस किचन हे बार्देशमध्ये असेल तर थोड्याच काळात सर्व गोव्यात क्युएसआर सुरू करणार आहोत.येथे तुम्हाला स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार केलेले पदार्थ टेकअवे पद्धतीने नेता येतील.ही सुविधा प्रथम उत्तर गोव्यात तर नंतर सर्व गोव्यात उपलब्ध होईल.

आम्ही हे पदार्थ फूड व्हॅनच्या माध्यमातून गोव्यातील महत्वाच्या समुद्र किनारी उपलब्ध करून देणार आहोत.यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना या नव्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल. तसेच यामुळे सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होईल.”गार्गी चौधरी यांचा जन्म कोलकोता येथे झाला असून त्या २०१४ साली आपल्या पतीसह गोव्यात आल्या.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की “इडली हा प्रसिद्ध दाक्षिणात्य शाकाहारी पदार्थ आहे,हा पदार्थ संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे.हा पदार्थ शुद्ध शाकाहारी असल्याने अनेक मांसाहारी लोक इडली खात नाहीत.या साच्यातून बाहेर पडण्यासाठीच ओह इडली स्थापन करण्यात आली आहे. आम्ही या शाकाहारी पदार्थाला मांसाहारी ट्विस्ट दिला आहे.ही मांसाहारी इडली चविष्ट तसेच आरोग्यदायी आहे. आमचे पदार्थ हे स्वच्छ तर असतातच पण त्याशिवाय ते बनविताना आम्ही मिनरल वॉटर,मशिनरी आणि उच्च दर्जाचे अन्न घटक वापरतो.

आम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड करत नाही.यामुळेच आम्ही आरोग्य आणि चव यांचा विचार करून मांसाहारी फ्लेवर्ड इडली लाँच केली आहे.ही इडली तुम्ही दुपारी अथवा रात्रीही खाऊ शकता.

याआधी तुम्ही तोंडाला पाणी आणणारी अशी चविष्ट इडली  कधीच खाल्ली नसेल.याच्यासाठी आम्ही गोव्याची निवड केली कारण गोव्यामध्ये जगभरातील लोक येतात व त्यांच्या संस्कृतीचे एकमेकांसोबत संबध तयार होतात.सध्याच्या डिजिटल युगात तसेच कोविड परिस्थितीत क्लाउड किचनचे महत्व वाढले आहे.लोक घरातून फूड डिलिव्हरी ऍपच्या माध्यमातून आमचे अन्नपदार्थ मागवू शकतात.”

गोव्यात राहिल्यामुळे त्यांना कळाले की गोव्याच्या मार्केटमध्ये स्पर्धा कमी आहे,येथील मार्केट अजूनही खुले आहे,गोवा भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे आणि येथील लोक खाण्याचे शौकीन आहेत.या सर्वांचा विचार करून उद्योजिका बनण्यासाठी त्यांनी फूड क्षेत्रात स्टार्टअप चालू करण्याचे ठरविले.येथे विविध देशातील पर्यटक येत असल्याने येथे ब्रँड मार्केटिंग करणे हे अन्य राज्यांपेक्षा सोपे जाईल असे त्यांना वाटले.यानंतर त्यांनी या स्टार्टअपबाबत जिएसबीसोबत चर्चा केली व अनेक पध्दतीचा अभ्यास करून मग त्यांनी हे उत्पादन भारतात सर्वप्रथम लाँच करण्याचे ठरविले.ओह इडली म्हणजे जिएसबीच्या इकोसिस्टीमने घेतलेला धाडसी पुढाकार आहे.

तुमच्या दुपारच्या अथवा रात्रीच्या खाण्याची इच्छा असो ‘ओह इडली’ तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.तर मग तुमच्या तोंडाला पाणी आणणारी,चविष्ट आणि अद्वितीय इडली खाण्यासाठी तयार राहा आणि ओह इडली खाऊन तुमची तृष्णा पूर्ण करा.