Home | बिझनेस | ‘कोरोना’संबंधित मोफत उपचारांसाठी ‘टेलि-हेल्थनेटवर्क’, ‘स्वस्थ’ स्थापन

‘कोरोना’संबंधित मोफत उपचारांसाठी ‘टेलि-हेल्थनेटवर्क’, ‘स्वस्थ’ स्थापन

Swasth Mobile App

देशातील जनतेला ‘कोरोना’चे उपचार सहजपणे उपलब्ध व्हावेत, त्यांना सर्वोत्कृष्ट डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला यांचा लाभ डिजिटल स्वरुपात घेता यावा, या हेतूने आरोग्यसेवा क्षेत्रातील शंभराहून अधिक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ‘स्वस्थ’ या नावाचे ‘मोबाईल अँप्लिकेशन’ विकसीत केले आहे. 

‘कोरोना’च्या साथीच्या काळात जनतेला ‘टेलि-मेडिसीन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व निष्णात तंत्रज्ञांनी हा ‘स्वस्थ’च्या रुपाने प्रतिसाद दिला आहे. राज्यांच्या भौगोलिक सीमा आणि जनतेचे उत्पन्नाचे स्तर यांच्यापलिकडे जाऊन आपल्या 1.3 अब्ज लोकसंख्येला एकसारखी व परवडण्याजोगी आरोग्यसेवा पुरविण्याची सुविधा या ‘मोबाईल अप’मध्ये आहे. 

संपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्रापुढे ‘कोविड-19’चे आव्हान उभे आहे; अशा प्रसंगी ही एतद्देशीय डिजिटल आरोग्यसेवा यंत्रणा सादर करण्यात आली असल्याने, तिचे महत्त्व मोठे आहे.

स्वस्थच्यानियामकमंडळाचेसदस्यक्रिसगोपालकृष्णन म्हणाले, ‘’सध्याच्या संकटाच्या काळात नागरिकांना त्वरीत व मोफत उपचार देण्याकरिता ‘स्वस्थ’ने देशातील सर्वोत्कृष्ट डॉक्टरांचे पथक उभे केले आहे. वैद्यक परिषद, सार्वजनिक आरोग्य केंद्रे व खासगी क्षेत्र या सर्वांच्या समन्वयाने जनतेला चांगल्या गुणवत्तेची आरोग्यसेवा देणे आणि सार्वजनिक आरोग्याची जपणूक करणे हे ‘स्वस्थ’चे काम असणार आहे. ‘कोरोना’च्या संकटाच्या निमित्ताने भारतात आरोग्यसेवेमध्ये मूलभूत बदल घडवून आणण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे, असे माझे मत आहे.’’

देशातील 1.3 अब्जलोकसंख्येलासमानस्वरुपातसेवामिळवितायेण्यासाठी ‘डिजिटलआरोग्यसेवा’ उपक्रम

  • ‘कोरोना’च्या राष्ट्रीय संकटाचा सामना करण्यासाठी शंभराहून अधिक खासगी व ‘ना-नफा’ संस्थांची हातमिळवणी
  • नागरिकांना सबल करण्यास ‘डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म’ उभारण्याचा भारतातील पहिलाच उपक्रम
  • नोंदणीकृत डॉक्टर्स व रुग्ण यांच्यात सुरळीत व दूरस्थ पद्धतीने संवाद घडवून आणण्याचे कार्य ‘स्वस्थ’कडून होणार सुकर
  • अॅप-आधारित सल्लासेवा हिंदी, इंग्रजी व गुजरातीमध्ये सुरुवातीस उपलब्ध; अन्य 25 भारतीय भाषांमध्य़े लवकरच विस्तार

‘स्वस्थ’मुळे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी व रुग्ण यांच्यात व्हिडिओ व दूरध्वनी यांच्या माध्यमातून सुरळीतपणे, दूरस्थपणे संवाद प्रस्थापित होईल. रुग्णाची स्थिती किती गंभीर आहे, हे पाहून त्याला कोणते उपचार द्यावयाचे, याचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे करण्यात येईल आणि त्यानुसार ‘डिजिटल स्वाक्षरी’ असलेल्या ‘प्रिस्क्रिप्शन’द्वारे औषधोपचारांची योजना व तसा सल्ला रुग्णांना देण्यात येईल. 

मोफत सल्ला देण्याबरोबरच, रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’साठीची मदत, त्यांच्या आजाराचे निदान, औषधोपचार, तसेच रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता व त्यांच्या नोंदणीची व्यवस्था आदी सेवादेखील ‘स्वस्थ’मधून अल्प दरांत देण्यात येणार आहेत.

‘स्वस्थ प्लॅटफॉर्म’वर नेमण्यात आलेल्या सर्व डॉक्टरांची व्यवस्थित पडताळणी झालेली आहे. त्यांना ‘टेलि-कन्सल्टेशन’ देण्याचे व ‘कोविड-19’च्या वैद्यकीय उपचारांविषयीचे खास प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आरोग्यसेवांच्या प्लॅटफॉर्म्ससाठीचे, उद्योगांमध्ये मान्यताप्राप्त असे, सायबर सुरक्षेचे सर्व निकष ‘स्वस्थ’साठी पाळण्यात आले आहेत. 

‘अँप ’मधील ‘डेटा’चे प्रसारण, त्याची साठवणूक, व्यवस्थापन व हाताळणी या बाबी सुरक्षितपणे व्हाव्यात, याकरीता ‘डिफेन्स-इन-डेप्थ’ ही पद्धत वापरण्यात आली आहे. या ‘अँप ’मधून सध्या हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषांमध्ये सल्ला देण्यात येत आहे आणि लवकरच ही सेवा इतर 25 भारतीय भाषांमध्ये सुरू करण्यात येईल. 

नागरिकांना उपचार मिळविण्यात सक्षम करणारा, सर्वसामान्यांना डिजिटल आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा ‘स्वस्थ’ हा भारतातील पहिलाच मोठा उपक्रम आहे.

नियामकमंडळातीलएकसदस्यडॉ. नचिकेतमोर यांच्या म्हणण्यानुसार, ‘’डॉक्टर्स, लहान-मोठी रुग्णालये, चाचणी केंद्रे, औषधालये, टेलि-मेडिसीन प्लॅटफॉर्म्स, विमा कंपन्या, आरोग्यसेवा-तंत्रज्ञान कंपन्या या भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्र येऊन सुरू केलेला ‘स्वस्थ’ हा एकमेवाद्वितीय असा ‘ना-नफा’ तत्वावरील उपक्रम आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना साथीच्या काळात परवडणारी आरोग्यसेवा तात्काळ मिळावी, तसेच त्याच्या आरोग्यविषयक इतर गरजाही पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम सुरू झालेला आहे. ‘स्वस्थ’च्या सदस्य डॉक्टरांकडून रुग्णांना वैद्यकीय सेवा सहजपणे घेता यावी आणि या सदस्यांनादेखील आपल्या रुग्णांना व्यापक स्वरुपाची उच्च दर्जाची सेवा देता येणे शक्य व्हावे, असे ‘स्वस्थ’चे प्रयोजन आहे. प्रगत मार्गदर्शक सूचनांनुसार, रुग्णांना घेता येतील अशा उच्च प्रतीच्या विविध उपाययोजना, त्यासाठीचे तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्म यांची उपलब्धताही हे सदस्य डॉक्टर ‘स्वस्थ’च्या माध्यमातून करू शकतील.’’

या प्रकल्पातीलप्रमुखसदस्यडॉ. एन. के. जयराम यांनी नमूद केले, की ‘कोरोना व्हायरस’च्या उद्रेकाला आपण सर्वजण तोंड देत असताना आणि हा उद्रेक नाहिसा करण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे असताना, टेलि-मेडिसीन हा आपल्या आरोग्यसेवा यंत्रणेचा एक अविभाज्य भाग बनू लागला आहे. ‘टेलि-मेडिसीन’ची पद्धत 2000च्या सुरुवातीच्या काळातच डॉक्टर वापरू लागले होते. सध्याच्या परिस्थितीत ही पद्धत वापरणे रूढ होऊ लागले आहे. ‘स्वस्थ’मुळे ‘टेलि-मेडिसीन’ला आणखी गती येईल आणि त्यामुळे रुग्णांना त्वरित निर्णय घेणे व स्वतःची काळजी घेण्यास शिकणे शक्य होईल. 

स्वस्थ हा ‘ना-नफा’ तत्वावरील प्रकल्प आरोग्यसेवा प्रदाते, आंत्रप्रूनर्स, कुशल तंत्रज्ञ व डॉक्टर्स यांनी निर्माण केला. कोरोना उद्रेकाविरुद्ध लढणाऱ्या स्टार्टअप उपक्रमांना पाठबळ देणारे गुंतवणूकदार व आंत्रप्रूनर्स यांच्या ‘एसीटी ग्रॅंट्स’ या प्लॅटफॉर्ममधून ‘स्वस्थ’ला 10 कोटी रुपयांचे (1.3 दशलक्ष डॉलर) अनुदान मिळाले आहे.