Home | आरोग्य | डॉक्टरच्या सल्याशिवाय औषधें खरेदी करत असाल तर पाकिटावरील ‘लाल रेषेचा’अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे

डॉक्टरच्या सल्याशिवाय औषधें खरेदी करत असाल तर पाकिटावरील ‘लाल रेषेचा’अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे

Red Strip on the Medicine Packets

आरोग्यविषयक काहीही त्रास जाणवल्यास आपण प्रारंभिक उपचार म्हणून जवळच्या मेडिकल मधे धाव घेतो आणि औषधें खरेदी करून त्यांचे सेवनही करतो, डॉक्टरचा सल्ला घेणे आपण टाळतो पण हे सर्व किती हानिकारक ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का? औषदाच्या पाकिटावरील त्या लाल रेषेचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नसेल तर हा लेख आवर्जून वाचा. 

आपल्याला जर का ताप, सर्दी,खोकला,अंग दुखणे,कंबर, पाठ दुखणे इत्यादी झाले तर आपण सरळ फार्मसी मध्ये जाऊन औषधें खरेदी करतो, पण हे करताना डॉक्टरचा सल्ला घेत नाही. आपल्याला माहित असलेल्या किंवा फार्मेसी मधे विचारुन गोळ्या घेतो. पण तुम्हाला माहित नसेल कि आपण गोळ्या किंवा कुठलीही औषधे घेण्यापुर्वी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणे हे मोठ्या चुकीचे ठरू शकते. 

औषधे खरेदी करतेवेळी पाकिटावरील बार कोड्स किंवा त्याविषयिची माहिती नसते व आपण लक्षही देत नाही व जाणूनही घेत नाही त्यामुळे आपलच नुकसान होऊ शकतं. आपण पाकिटावरील चिन्हे किंवा त्यावर काय लिहिले आहे याकडे दुर्लक्ष करतो आणि औषधांचे सेवन करतो पण आता त्याबाबतीत आरोग्य मंत्रालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

बारीक सारिक दुखणे किंवा वायरल आजार जरी झाला तरी आपण एकेकदा न विचार करता जवळच्या लोकल स्टोर मधून, किंवा मेडिकल मधे जाऊन गोळ्या घेतो ते किती घातक आहे व याचे परिणाम काय होऊ शकतात ते नंतर दिसून येतात. 

औषधांच्या पाकिटावर असलेल्या इशाऱ्यांकडे ग्राहकाने लक्ष दिले पाहिजे. मेडिकल मधे असलेल्यांना गोळ्यांच्या बाबतीत संपूर्ण ज्ञान असतंच असं नाही त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

औषधाच्या पाकिटावर लाल रंगाची रेष असते त्याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नसते. डॉक्टर किंवा फार्मासिस्ट सोडले तर सामान्य लोकांना त्याविषयी ज्ञान नसते. त्या रेषेचा अर्थ असा की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते औषध घेणे वा विकणे प्रतिबंधित आहे. 

फार्मासिस्ट चंदन साह यांच्या म्हणण्यानुसार, अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर रोखण्यासाठी फक्त औषधांच्याच पाकीटावर लाल रंगाची पट्टी लावली जाते. औषध विक्रेत्याने देखील डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशी औषध विक्री करु नये.

तसेच अनेक औषधांच्या पाकीटावर आरएक्स असं लिहिलेले असते. या आरएक्सचा अर्थ असा आहे की, असे औषध केवळ आणि  केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे. काही औषधांवर एनआरएक्स देखील लिहिलेले असते. या एनआरएक्सचा अर्थ असा होतो की, ही औषधे घेण्याची परवानगी केवळ असेच डॉक्टर देऊ शकतात, ज्यांना या औषधांची विक्री करण्यास परवाना मिळाला आहे.

मग तुम्ही जर तसे करत असाल तर आजच सावधान व्हा आणि कोणतेही औषध खरेदी करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणे मात्र विसरू नका. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कळवा. 

Scroll to Top