Home | आरोग्य | दररोज जेवणानंतर ह्या पदार्थाचे पाण्यातून सेवन करा, अपचन, गॅस आणि चरबी वाढणे कमी होईल

दररोज जेवणानंतर ह्या पदार्थाचे पाण्यातून सेवन करा, अपचन, गॅस आणि चरबी वाढणे कमी होईल

Drink this with water everyday

पोट साफ नसणे ही बऱ्याच जणांची समस्या आहे. या पोटाच्या तक्रारीमुळे बरेच जण चिंतातूर असतात. पोटाची चरबी वाढणे, छातीत जळजळ, पाद येणे, तोंडाला पाणी सुटणे, डोके दुखणे या प्रकारचे त्रास अपचन किंवा पोटाचा काही विकार झाला असल्यास त्रासदायक ठरतात व यांचं मुख्य कारण आणि केंद्रबिंदू म्हणजे ‘पोट साफ नसणे’ होत. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. दररोज या पदार्थाचा पाण्यातून सेवन करा आणि पोटाच्या सर्व समस्यांतून मुक्त व्हा.    

वजन वाढीस कारणीभूत आहे ते अपचनाची समस्या, त्याचबरोबर जर नियमित पोट साफ नसेल तर मुळव्याधी सारखे त्रास होण्याची शक्यता आहे व होतात. ज्यांची पित्त प्रकृती असते त्यांना तर याचे त्रास प्रकर्षाने होताना दिसून येतात. त्यासाठी आयुर्वेद, एलोपैथी, होमियोपैथी मध्ये  अनेक उपाय आहेत. या लेखातून तुम्हला आणखी एक उपाय मिळेल ज्याने तुमचे पोट, १०० टक्के साफ राहिल. या उपायाचा लाभ तुम्हला उपाय केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पहायला मिळेल. घरगुती उपाय असल्याने या उपायसाठी लागणारे साहित्य घरातच उपलब्ध असते.

हा उपाय करते वेळी सैंधव मीठ आवश्यक आहे. कारण सैंधव मीठ हे पचन सवस्थेसाठी वा त्या संबंधीच्या तक्रारीसाठी अत्त्यंत उपयुक्त आहे. एक छोटा चमचा हे मीठ लागणार आहे. हिंग हा दुसरा घटक या उपायासाठी लागणार आहे. हिंग प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. हे पचनासाठी अत्यंत लाभदायक असते म्हणून हा उपाय करण्यासाठी एक चमचा हिंग लागणार आहे.

ओवा, हा घटक देखील महत्वाचा आहे. त्यामधे लोह, कॅल्शिअम, पोटॅशियम, आयोडिन, केरोटीन, कार्बोहायड्रेटिस, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. ज्यांचे दात दुखतात, तोंडचा वास येतो अशा व्यक्तींनी हा ओवा चावून बऱ्याच वेळा ठेवला तर आपल्या तोंडातील घाण निघून जाते. महिलांना मासिक पाळीच्या वेळी खूप वेदना होतात अशा या वेदना कमी करण्यासाठी एक चमचा ओवा घ्या आणि चावून चावून खा आणि एक ग्लास गरम पाणी प्या.

पोटदुखी, तसेच वेदना यापासून आराम मिळतो. गुडघेदुखी हा त्रास आता प्रत्येकालाच होतो त्यासाठी ओवा तव्यावरती गरम करून शेक दिला तर नक्कीच आराम मिळतो. ओवा एकदम बारीक करून घ्यायचा आहे. एक चमचा हा बारीक केलेला ओवा लागणार आहे. यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे पादेलोण. हे सहज आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होते. याचं एक चमचा चूर्ण आपल्याला लागणार आहे.

हे चारही पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. हे चारही पदार्थ आपले जेवण झाल्यानंतर साधारणतः पंधरा मिनिटानंतर घ्यायच आहे. साधं पाणी किंवा गरम पाणी एक ग्लास घ्या. या ग्लासमध्ये छोटे दोन चमचे हे तयार केलेले चूर्ण घ्या. हे मिश्रण एकजीव करा आणि हे तयार झालेलं मिश्रण हे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा गुण पाहायला मिळेल.

हा उपाय सलग सात दिवस केला तर पित्त असेल, अपचन असेल, गॅस होत असेल या सर्व समस्या कमी होतील. पोटाची चरबी कमी होईल, वजन कमी होईल. घरगुती व अगदी सोपा उपाय आराम व लाभदायक आहे.व प्रत्येकाने केल्यास गुणकारी आहे.नक्की करून बघा व निरोगी रहा 

Scroll to Top