Home | आरोग्य | जर तुम्हाला नियमितपणे डाळ भात खाण्याचे फायदे माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे

जर तुम्हाला नियमितपणे डाळ भात खाण्याचे फायदे माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे

Dal Rice

आपल्या दैनंदिन जीवनात पौष्टिक आहार खूप महत्वाचा असतो. शुद्ध शाकाहारी जेवण जेवणारे लोक खास करून ‘डाळ भात’चे भक्तच असतात असं म्हणायला हरकत नाही. मांसाहारी आहार घेणारे लोक देखील डाळ भातचा प्रयोग आपल्या भोजन व्यवस्थेत थोड़ा बदल करुन स्वीकारतात. आपल्या देशात भात सेवन करण्याचं प्रमाण आधिपासूनच आहे.  गोवा आणि महाराष्ट्रात देखील भातप्रेमी लोक आढळून येतात.

अनेकांना भात जेवायला आवडतो.मग तो दुपारच्या जेवणात असो वा रात्रीच्या.परंतू डाळ भात हे रोजच्या जेवणात सेवन केले तर त्याचा काही अपाय नाही हे लक्षात आले पाहिजे.आपण आपल्या दोन्ही वेळेच्या जेवणात डाळ भात समाविष्ट करू शकतो.

डाळी मधे नेमके काय असते जे पौष्टिक असते व आरोग्यासाठी का चांगले ते बघुया.डाळी मधे प्रोटीन्स जास्ती प्रमाणात सापडतात.त्याचप्रमाणे फायबर आणि कोलेस्ट्रॉलदेखील डाळीमधे मिळतात.भात या धान्यातून कार्बोहाइड्रेट्स आपल्याला मिळतात.डाळ भात हा चांगला पचतो व सेवन करण्यास सोपा ठरतो.

वेळ हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्यामुळे,लोक 3 कारणांमुळे डाळभात करण्यास सज्ज असतात.एक म्हणजे लवकर हा पदार्थ शिजवता येतो.इतर पदार्थांच्या तुलनेत डाळ भात लवकर करता येतो.त्यामुळे वेळ वाचतो व जेव्हा वेळ नसतो तेव्हा पटकन होणारा म्हणजे डाळ भात.पोटही भरतं व भूकही लगेच लागत नाही.

दूसरे कारणअसे आहे त्ये म्हणजे डाळ भात पौष्टिक तर असतोच शिवाय स्वादिष्टही असतो.त्यामुळे लोकांना जेवताना हे अन्न चालून जातं.तीसरे कारण असे की,कुठल्याही वयातील माणसं हे अन्न ग्रहण करू शकतात.कारण ते पचनीय असतं व मोठ्या प्रमाणात चालून जातं.

वजन वाढणे हा खूप लोकांसाठी कंटाळवाणा भाग असतो.कोणालाच आपले वजन वाढलेले आवडत नाही.खूप जणांची अशी समजूत असते की भातामुळे वजन वाढते पण तसे काहीही होत नाही.डाळ भात खाल्ल्यामुळे पोट भरलेले उरते व त्यामुळे दिवसभर जरी काही खाल्ले नाही तरी रिकामे वाटत नाही.व काही खाण्याची आवश्यकता भासत नाही.

भाताचे सेवन केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागत नाही व कैलोरीज़ वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.अतिरिक्त वजन वाढण्याची चिंता आपल्याला उरत नाही.

डाळीमध्ये अनेक प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. जे भातामध्ये नसतात परंतु जेव्हा आपण डाळ आणि भात एकत्र करून खातो तेव्हा हे आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक बनत असते. तांदूळ व डाळी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर मिळत असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.

भुरकट रंगाच्या तांदळामध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम, मॅग्नीज, कॉपर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते.आपल्या पचन क्रियेसाठी फायबर गरजेचे असते व ते आपल्याला भातातून मिळते.पांढऱ्या रंगाच्या भातापेक्षा जर भुरकट रंगाचा भात जेवालात तर जास्ती लाभदायक असते.त्यामुळे जर आपण त्या तांदळाचा भात जेवलो तर पौष्टिक आहार आपल्याला मिळेल व आपले आरोग्य,स्वास्थ्य निरोगी राहिल.

Scroll to Top