Home | आरोग्य | तुमची किडनी खराब होत असल्याची हि 7 लक्षणे नजरअंदाज करू नका वेळीच सावध व्हा

तुमची किडनी खराब होत असल्याची हि 7 लक्षणे नजरअंदाज करू नका वेळीच सावध व्हा

Seven Signs That Your Kidney May be Failing

किडनी हि आपल्या शरीरातील एक अतिशय महत्वाचा अवयव आहे आणि जर का ती निकामी झाली तर मग मृत्यु शिवाय पर्याय नाही, त्यामुळे वेळीच सावध होणे हा एकच पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो. सध्या आपल्या मॉडर्न लाइफस्टाइलमुळे किडनी फेल होण्याच्या बऱ्याच केसेस आढळुन येतात आणि किडनी फेल हिण्यामागे अनेक करणे असू शकतात. मात्र किडनी ही अचानक खराब होत नाही. किडनी फेल होण्यापूर्वी मानवी शरीर अनेक लक्षणे दाखवत असते. अशा खुणा शरीर दर्शवते ज्यामुळे आपल्याला समजले पाहिजे कि शरीरात काहींना काही बिघाड नक्की झालेला आहे. मात्र आपण अशा लक्षणांकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि मग किडनी गमावण्याची वेळ येते.

जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. किडनीच्या त्रासाने डॉक्टरकडे जाण्याची वेळ येण्याअगोदर तुम्हाला शरीर कोणती कोणती लक्षण दाखवू लागत हे लेखामध्ये सांगणार आहोत. हि लक्षण वेळीच ओळखून आपण डॉक्टरकडे जायला हवं.

आपली लघवी सतत तपासा 

किडनी खराब होण्यामागचं सर्वात पहिलं कारण आहे आपल्या लघवी संबंधित. तुम्हाला लघवीची जी सवय आहे, तुम्हाला जर वारंवार रात्री लघवीला उठाव लागत असेल पण लघवीला गेल्या नंतर लघवीला होत नसेल, लघवीचा जो नॉर्मल रंग आहे त्यापेक्षा गडद रंगाची लघवी होत असेल, लघवीला जास्त बुडबुडे, फेस येत असेल.

तसेच लघवीमध्ये रक्ताचे काही कण आढळून आले, लघवी करताना वारंवार जळजळ होत असेल, वेदना होत असतील तर मित्रानो लक्षात घ्या कदाचीत हा तुमची फेल होण्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळ न घालवता त्वरित फॅमिली डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेट द्या.

तुम्हला चक्कर थकवा अनुभवतो 

मित्रानो तुम्हाला वारंवार चक्कर येऊ लागतील. एक प्रकारची कमजोरी तुम्हाला शरीरात दिसून येईल. संपूर्ण शरीर थकलेले तुम्हाला जाणवेल. अशी लक्षण जर तुम्हाला जाणवत असतील तर लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होत आहे. कारण किडनीच जे काम आहे ते तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढायचं आहे, ते काम थांबलय किंवा कमी गतीने होऊ लागलंय. 

याचं एक कारण तुमची किडनी खराब होत चालली आहे. आणि म्हणून र क्ताची कमतरता येत असून थक वा निर्माण होत आहे. यालाच एनि मिया किंवा पंडुरोग असं म्हणतात. यामध्ये चक्कर आल्यासारखं डोकं फिरल्यासारखं वाटत. एक प्रकारे शरीराचं संपूर्ण संतुलन बिघडत. बऱ्याच गोष्टींचा विसर पडू लागतो, कामावर लक्ष केंद्रित होत नाही. फुफ्फुस पण काम करणे हळू हळू बंद करू लागतात. थोडं जरी काम केले तरी धाप लागते. तर मित्रानो अशी लक्षणे दिसत असतील तर ती लक्षण किडनी फेलची आहेत हे लक्षात घ्या. आणि त्वरित डॉक्ट रला दाखवा.

तुमच्या शरीरामध्ये सूज येणे 

तुमच्या शरीराला सूज आल्यासारखी वाटत असेल विशेष करून हात. हात सुजलेले आहेत, पायांवर सूज आलेली असेल. सांधे दुखत असतील, चेहरा सुजलेला आहे, डोळ्यांच्या खाली सूज दिसत असेल. या 4 ते 5 ठिकाणी तुम्हाला सूज दिसली आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या चेहऱ्याची त्वचा तुम्ही बोटाने दाबून पाहिलीत तर ती तशीच थोडा वेळ दाबलेली राहिली आणि सावकाश मंद गतीने पुन्हा वर आली तर लक्षात घ्या ताबडतोब डॉ क्टरी सल्ला घ्यायला हवा.

सूज येण्यामागचं कारण हे आहे कि तुमच्या शरीरातून जे बाहेर पडायला पाहिजे ते बाहेर पडत नाहीये परिणामी अशी लक्षण समोर येत आहेत. अर्थातच किडनी व्यवस्थित रित्या कार्यरत नाहीये.

तुमची त्वचा फाटणे 

आपली त्वचा विनाकारण फाटत असेल, त्वचेला चिरा पडत असतील, त्वचा विनाकारण उकलत असेल, रॅशेस पडत असतील आणि त्या ठिकाणी खाज येत असेल. लक्षात घ्या हिवाळ्यात हा प्रॉब्लेम सर्रास होतो पण हिवाळा नसताना सुद्धा अशी लक्षण आढळून येत असतील तर लक्षात घ्या किडनी फेल होत चालली आहे अथवा किडनी तिचे काम नीट करत नाहीये.

कॅल्शि यम आणि फॉस्परस यांचे संतुलन जेव्हा बिघडते तेव्हा अशी लक्षणे समोर येतात. आणि म्हणून तुमच्या शरीरावरील त्वचेवर याचे दुष्परि णाम दिसत आहेत. हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आढळून आलेले आहे.

तुमची पाठ आणि पोटामध्ये सतत दुखणे 

तुमची पाठ विनाकारण दुखत असेल. तुम्ही कोणतेही काम केलेले नाहीये तरी सुद्धा पाठ दुखत आहे, पोटाच्या दोन्ही बाजू दुखू लागल्या आहेत, शरीर आखडल्या सारखं वाटतंय, सांधे आखूड झाल्याची फिलिंग येत आहे. मित्रानो हे सुद्धा किडनी फेल होण्याच लक्षण आहे.

तुम्हाला थंडी ताप येत असेल 

मित्रानो वातावरणात अजिबात बदल झालेला नाहीये अगदी वातावरण नॉर्मल आहे तरी सुद्धा तुम्हाला थंडी वाजत आहे, ताप येत आहे. हे सुद्धा किडनी फेल होण्याचे एक कारण आढळून आलेले आहे.

तुम्हाला वारंवार उलट्या आणि गॅस होतंय 

मित्रानो तुम्हाला जर वारंवार उलटी आल्यासारखं होत असेल, पोटात वारंवार गॅ स होत असेल. दररोज सकाळी गॅ सची समस्या वाढत चालली असेल आणि उलटी वर औषध घेऊन सुद्धा उलटी थांबत नाहीये तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. हे लक्षण सुद्धा किडनी फेल होण्यामागे आढळून आलेले आहे. मित्रानो जेवढी लक्षण सांगितली त्यातली 2-3 लक्षण एकाच वेळी तुमच्या शरीरात आढळून आली तर लक्षात घ्या किडनी वर परिणाम होत आहे. कदाचित किडनी धोक्यात येत आहे. डॉक्टर कडे जाण्याचा कंटाळा करू नका. नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा योग्य ती खबरदारी योग्य वेळेत घ्या.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Scroll to Top