Home | आरोग्य | मधुमेहाची सुरवात या 12 लक्षणांने होऊ शकते, त्यासाठी हा लेख जरूर वाचा व जाणून घ्या

मधुमेहाची सुरवात या 12 लक्षणांने होऊ शकते, त्यासाठी हा लेख जरूर वाचा व जाणून घ्या

Diabetics

मधुमेह म्हणजेच ज्याला इंग्रजी मधे डायबेटिस म्हटलं जातं. या रोगाला अनेक जण घाबरतात. पहायला गेलं तर हा रोग कमी असतो तेवढ्यापर्यंत घाबरायची गरज नसते हे जरी खरं असलं तरी जेव्हा तो विशाल रूप घेतो तेव्हा मात्र बऱ्याच जणांच्या तोंडचं पाणी पळवतो असं म्हणायला हरकत नाही. नियमित व्यायाम, पोषक आहार, फळांचा रस, भाज्या खाणे हे सगळे आवश्यक आहे व आपण ते करतो देखील. तरीही मनात भीतीचा डोंगर उभा असतोच.

आनंदी जीवन जगायचे असेल तर कुठलीच बंधने आपल्याला नको असतात. पण असे काही झाले की अनेक निर्बंध आपल्यावर येतात व आयुष्य कंटाळवाणे वाटू लागते.मधुमेहामुळे आपण मानसिक व शारीरिक रित्या खूपच कमजोर होतो. रोगप्रतिकार शक्ति कमजोर होते. कोणतेही आजार होण्याची शक्यता असते. छोटीशी जखम सुद्धा झाल्यास रक्तातिल अतिरिक्त साखरेमुळे लवकर भरून येत नाही व चिघळते.

जखम वाळायला 1 ते 2 महीने लागतात व गँग्रीन होऊ शकतो. जीवनशैलित अनेक बदल करावे लागतात. शिस्तबद्ध जीवन जगावे लागते. आहार विहाराच्या बाबतीत कड़क राहवे लागते.

मधुमेह का होतो?

आपण जेवतो,त्यानंतर पोटात पचन झालेलं अन्न त्यातील ग्लूकोस पुढे जाण्यासाठी रक्तात मिसळतं. ग्लूकोस इन्सुलिन नावाच्या हार्मोन्सच्या मदतीने, एनर्जी परिवर्तित करते, व त्यातून मिळालेली ऊर्जा आपल्याला नित्य कामात वापरता येते.

कधी कधी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रोज खाल्ले, फायबर युक्त पदार्थ जेवणात कमी वापरले, किंवा POCD सारख्या इतर कारणांमुळे होणाऱ्या हार्मोनल इंबॅलंसमुळे शरीरात ग्लूकोस ची पातळी वाढते.

केव्हा केव्हा तर असे होते की काही पेशी इंसुलिन स्वीकारणे बंद करतात. इंसुलिन रेसिस्टेंट ची स्थिती निर्माण होते. व पेशींना जायचे ग्लूकोस रक्तात मिसळते.त्यामुळे रक्तातली साखर वाढते व त्याच स्थितिला मधुमेह अर्थात डायबेटिस असे म्हणतात.

मधुमेहाचे गुप्त अगुप्त संकेत.

१.भूक शांत न होणे..

जेव्हा प्री डायबेटिसची स्थिती असते तेव्हा जरी आपण कितीही खाल्लं तरी भुकेचं शमन होत नाही. जे अन्न जेवून ५ ते ६ तास पुरेल असं वाटतं तेच जेवल्यानंतर पुन्हा भूक लागते. तेव्हा समजते की शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्ती साखर झालेली असते.

२.सतत थकवा येणे..

इन्सुलीन रेसिस्टेंट मुळे ग्लूकोस ऊर्जेत परिवर्तीत होत नाही व त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे थकवा जाणवतो.

३.पुन्हा पुन्हा लघवी होणे..

मूत्रविसर्ग मधुमेहाच्या रुग्णामधे दिसून येतो, विशेष करून रात्रीच्या वेळी. शरीरातील ग्लूकोसच्या वाढलेल्या मात्रेमुळे, किडणीच्या शुद्धिकरणाचे काम वाढते व त्यामुळे जास्ती लघवी होते.

४.तहान लागणे..

या रुग्णांना लघविचा त्रास होत असल्याने, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे अधिक तहान लागते. कारण घशाला सतत कोरड पडलेली असते.

५.त्वचेला खाज येणे..

शरीरात पाणी कमी होत असल्याने त्वचा कोरडी पड़ते व अन्य अवयवांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे त्वचेला खाज येऊ लागते.

६.दृष्टी अंधुक होणे..

डोळ्यातील रक्तवाहिन्या फार नाजुक असतात.रक्त वाहिन्यातील ग्लूकोस चे रक्ताभिसरण नीट न झाल्याने त्यांना ईजा होते. व त्यामुळे डोळ्याना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. व दॄष्टि नाजुक व धूसर होते. त्यामुळे सर्व काही अस्पष्ट दिसायला लागते.

७.यीस्ट इंफेक्शन..

यीस्ट व फंगस हे ग्लूकोस वर जगतात असं म्हटलं जातं. शरीरात ग्लूकोस चे प्रामाण वाढल्याने घामात देखील एक विशिष्ट प्रकारचे ग्लूकोस उतरते. व त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतात. शरीरात ओल्या भागावरती हे इंफेक्शन मोठ्या प्रमाणात दिसून येते.

८.जखम लवकर न बरी होणे..

ग्लूकोज वाढले की रक्तातील घाव कमी करणारा घटक कमी होतो. त्यामुळे बारीक सारीक जखमा देखील लवकर बऱ्या होत नाहीत. जखम चिघळून त्याचे रूपांतर गँग्रीन मधे होते.

९.हात पाय बधीर होणे..

शरीरात असलेल्या बारीक सारीक रक्तवाहिन्या त्यांना ग्लूकोस वाढल्याने ईजा होते व रक्ताभिसरण नीट होत नाही त्यामुळे शरीरातील एकेक अवयव बधीर व्हायला लागतात.

१०.लहान मुलांना मधुमेह असण्याचे संकेत..

गादित लघवी न करणाऱ्या मुलांना अचानक लघवी होते, तर त्याचे कारण मधुमेह असू शकते.

११.गर्भवती स्त्रियांना होणारा त्रास..

या काळात भरपूर हॉर्मोनल इंबैलेंस होतात व त्यामुळे gestational diabetes होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

१२.pcod,pcos,

यांमुळे देखील शरीरात इंसुलिन रेसिस्टेंट होते.अशा महिलांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.

पौष्टिक आहार व नियमित व्यायाम याद्वारे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो व मधुमेहाचा धोका शक्य तेवढा टाळू शकतो.

टिप: हा लेख वाचून अमलात आणण्याअगोदर डॉक्टर्स चा सल्ला घ्यावा