चालणे हे एक अतिशय परिणामकारक व्यायाम आहे, आणि दिवसातून फक्त 30 मिनिटे चालले कि तुमच्या शरीरामध्ये असे बदल घडून येतील ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जर फक्त चालल्याने इतका फरक पडू शकतो, मग कसला विचार करता, चला तर आजपासून दररोज 30 मिनिटे चालायला पण, त्याअगोदर हा लेख जरूर वाचा…
जसं “An Apple a Day Keeps a Doctor Away” अशी इंग्रजीत म्हणतात, त्याचप्रमाणे नियमित पायी चालणं अत्यंत आवश्यक व लाभदायक असतं. चालणे हे माणसाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. नियमित चालल्याने काय होतं ते जाणून घेऊया. चांगली झोप आणि निरोगी आहाराबरोबरच नियमित पायी चालणं हे सुद्धा एक चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणायला हरकत नाही. शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
आपल्या चाललेल्या धकाधकीच्या व तणाव पूर्ण जीवनात प्रत्येकालाच वेळ मिळतो असे नाही. पण स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं व महत्त्वाचं आहे. कोरोना कालखंडात सर्वजण घरातच बसून असल्यामुळे पायी चालण्याचं प्रमाण कमी झालं. जवळजवळ बंदच झालं म्हणायला हरकत नाही. पण व्यायाम हा खरंच आताच्या काळात देखील हवा असतो. मानसिक ताण तणावामुळे, जरा मोकळ्या वातावरणाची गरज असते. आरोग्यासाठी चालण्याचे बरेच फायदे आहेत.ते कोण कोणते ते जाणून घेऊया.
१ मेंदूत होतात सकारात्मक बदल
पायी चालण्याचे फायदे खुप आहे व त्यातील एक म्हणजे मेंदूत सकारात्मक विचारांचे संक्रमण होणे. एका अभ्यासावरुन असे सिद्ध झाले आहे की, कमी प्रभाव वाले एरोबिक व्यायाम, जसे पायी चालणे हे सुरवातीच्या डिमेंशिया किंवा स्मृति भ्रंशाला होण्यापासून रोखते. त्याचबरोबर अल्ज़ाइमर सारख्या रोगाचा धोका कमी होतो, व मानसिक आरोग्यही सुधारायला मदत होते.
२ हृदय रोगाचा धोका कमी होतो
या आजरासाठी चालणे खूपच लाभदायक असते. या विषयी अमेरिकन हार्ट असोसिएशन ने असे सांगितले आहे की, जेव्हा हृदय रोग किंवा स्ट्रोक पासून बचाव करण्याची वेळ येते तेव्हा चालणे हे प्रभावी ठरते. ही क्रिया उच्च रक्तताब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीला कमी करतात, व त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते व हृदयासंबंधीचे आजार टाळता येतात.
३ फुफ्फुसाना प्रशिक्षण मिळते
पायी चालणे हा एक एरोबिक व्यायाम आहे.यांमुळे रक्त प्रवाहात ऑक्सीजनचं प्रमाण वाढतं. शरीरातील विषाक्त घटक आणि कचरा दूर करण्यासाठी फुफ्फुसाला प्रशिक्षण देण्याचं काम करतं.पायी चालल्यामुळे दीर्घ श्वसन होतं व याचा लाभ असा की फुफ्फुसाला व्यायाम मिळतो व त्या संबंधीचे आजार दूर पळतात.
४ चालणे हे स्वादु पिंडासाठी फ़ायदेशीर
मधुमेहाला रोखण्यासाठी किंवा त्यावर लगाम घालण्यासाठी रोज चालणे हा उपाय चांगला आहे.एका अभ्यासात असे दिसून आले की चालणाऱ्या एका गटाने ६ महिन्यांच्या प्रायोगिक कालावधीत असलेल्या धावणाऱ्या गटाच्या तुलने, ग्लूकोज सहिष्णुता अंदाजे ६ पटीने सुधार करून उत्तम प्रदर्शन दाखविले आहे.
५ दररोज चालल्याने पचन प्रक्रिया सुधारते
दररोज 30 मिनिटे चालणे पोटाच्या आजरासाठी देखील चांगले असते.केवळ कर्क रोग च नव्हे तर पचन आणि बद्धकोष्ठता सुद्धा सुधारते.शरीरातील घाण किंवा मळ याद्वारे/मदतीने निघून जातो.
६ सांधे व हाडे बळकट होतात
सांध्यासाठी गतिशील पणा आवश्यक असतो तो चालल्यामुळे येतो.हाडे बळकट झाली म्हणजे फ्रैक्चरचा धोका जाणवत नाही.संधिवात फाउंडेशन सांधे दुखी इत्यादिसाठी नियमित 30 मिनिटे चालण्याचा सल्ला देतो.सांध्यातिल सूज किंवा कड़कपणा कमी होतो.