Home | आरोग्य | तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी होते तर याच्यामागचे कारण आणि उपाय जाणून घ्या

तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी होते तर याच्यामागचे कारण आणि उपाय जाणून घ्या

You feel like passing urine again and again

आपल्या शरीरात जी साचलेली घाण असते किंवा टॉक्सिन्स बाहेर जाण्याचं साधन म्हणजे मल मूत्र विसर्जन. लघवीमधे अति प्रमाणात मीठ असते. ज्याला किडनी मधील ब्लड फ्लो मधून वेगळे केले जाते. किडनी द्वारे एका मूत्रनलिकेद्वारे याला मूत्रवाहिनी कडे पाठवले जाते. यावेळी सामान्यतः मूत्र एकाच दिशांमध्ये प्रभावित होत असते. मूत्र वहिनीचा संबंध मूत्राशयाशी असतो.

जेव्हा मूत्र मूत्राशय भरले जाते तेव्हा, आपल्या शिरा द्वारे मेरुरज्जु म्हणजेच स्पायनल कॉर्ड च्या माध्यमातून आपल्या मेंदूकडे संदेश पाठवला जातो. अशाप्रकारे मूत्राशयाची प्रक्रिया सुरू असते. परंतु मूत्राशयासंबंधीचे आपल्याला अनेक प्रकारचे विकार होत असतात. त्यामुळे आपण खुप वेळा हैराण झालेलो असतो. यापैकीच एक समस्या अशी असते ती म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा लघवी येत असते.

यामधे सर्वप्रथम पुन्हा पुन्हा लघवीला लागते. त्यानंतर अजूनही काही समस्या उद्भवतात. रात्रीची लक्षणे जास्ती प्रमाणात दिसतात. त्यानंतर कालांतराने दिवसादेखिल ही लक्षणे दिसू लागतात. व मग आपण त्यावर नियंत्रण देखील करू शकत नाही परिणामी हळूहळू थेंबा थेंबा ने लघवी व्हायला लागते.

मग असे जाणवते की त्यांना लघवी येत नाही. हे त्या रोग्यासाठी प्रोस्टेट चे प्रथम लक्षण असू शकते. अनेकदा युरीन होण्यासाठी खूप त्रास होणे व युरीन पास होताना खूप वेळ लागणे हे देखील या रोगाचे लक्षणे असू शकतात.

या समस्येवर काहीतरी उपाय वेळीच करणे गरजेचे आहे. आपला आहार विहार, आपली जीवनशैली, यात बदल करणे आवश्यक आहे. 

ज्या पदार्थात साखर असते असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे, निदान यूरिन इन्फेक्शन च्या काळात तरी. साखरे द्वारे बनवलेले पदार्थ मूत्राशयाच्या रस्त्यामध्ये बॅक्टेरिया ब्रिल्डिंग करण्याचे काम करत असते. 

कॉफीचे सेवन या काळात वर्ज आहे. हर्बल टी चा उपयोग अन्य पेया ऐवजी करु शकता. त्याबरोबरच मद्यपान,धूम्रपान यांचे सेवन टाळले पाहिजे. व मसल्याचे, गुळ असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.