Home | न्युज | गोवा | 15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो

15व्या राष्ट्रीय वित्त आयोगाकडून राज्यातील पंचायत आणि जिल्हा पंचायतीना 75 कोटी रूपयांचा निधी मंजूर : मविन गुदिन्हो

Village Panchayat Majorda Goa

राज्यासाठी यंदा 15व्या राष्ट्रीय वित्तिय आयोगाकडून  75 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतींसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा प्रथमच वित्त आयोगाकडून दुप्पट निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

सध्याची कोरोना परिस्थीती सुधारल्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतअंतर्गत या निधीचा वापर करण्यात येईल. केंद्र सरकारकडून पंचायतींना अधिक निधी मिळावा यासाठी 15व्या राष्ट्रीय वित्तिय आयोगाकडे मागणी केली होती. त्यानुसार पहिल्यांदाच आयोगाकडून इतका निधी मिळालेला आहे.  ग्रामपंचायतींनी  स्वच्छता प्रकल्प, गांवाचे सौंदर्यीकरण, सांडपाण्याचे प्रकल्प या विकासकामांंसाठी प्रामुख्याने या निधीचा वापर करावा, असे आवाहन गुदिन्हो यांनी केले. 

ग्रामपंचायती व जिल्हा पंचायतींनी हा निधी वापरण्यासाठी तयार रहावे.

राज्य सरकारकडून वित्त आयोगासोबत झालेल्या बैठकीत जो निधी मागितला होता, त्याहून यंदा दुप्पट देण्यात आला आहे. प्रथमच 75 कोटी निधीतील 15 टक्के निधी म्हणजेच 17.5 कोटी निधी जिल्हा पंचायतीला जाण़ार आहे. 

राज्य सरकारच्या निधिला न थांबता यंदा जिल्हा पंचायतींना निधी वापरण्यास मिळेल. बाकीचा निधी राज्यातील 191 पंचायतींना जाईल. राज्य सरकारला या निधीचा वापर करता येणार नाही. केवळ ग्राम पंचायत व जिल्हा पंचायतींनाच या निधीचा वापर करता येईल, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

दरम्यान , कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांसंदर्भात अद्याप  निर्णय झाला नाही. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे निवडणुकीच्या तारखा देणे ठरेल. देशभरात कोरोनाची स्थिति गंभीर असून जेव्हा ही स्थिती सुधारेल, तेव्हाच निवडणुकीच्या तारखांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

Scroll to Top