कोलवा येथे घरकामाला असलेल्या १९–वर्षीय–मुलीचा संशयास्पद मृत्यूची बातमी समोर आलेली आहे आणि पोलीस त्याचा तपस करीत आहेत. पण या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे खरे कारण समाजापुढे येईल, का हे पण एक रहस्य बनून राहील? पोलीस योग्य दिशेने तपास करतील का? पोलीस अजून गुन्हा दाखल करून का घेत नाहीत आणि घरातील पुरुषांची डीएनए चाचणी अजून का केली नाही, शवविच्छेदनाचा अहवाल देण्यास पोलीस टाळाटाळ का करत आहेत? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणे अजून शिल्लक आहेत.
कोलवा येथे १९-वर्षीय-मुलीचा संशयास्पद मृत्यू होऊन काही दिवस निघून गेले तरीपण पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यात अपयशी ठरले आहेत. या मुलीच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या मृत्यूविषयी पोलीस अथवा समाजाकडून काहीही आवाज उमटलेला नाही. या मृत्यूचा छडा लागणार का हे प्रकरण सुद्धा दडपले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोलव्यातील एका श्रीमंत उद्दोजकाच्या घरी सादर मुलगी मागील तीन वर्षांपासून घरकाम करत होती. रक्तस्त्राव थांबत नाही म्हणून तिला एका खाजगी इस्पितळात प्रारंभिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता तेथून तिला दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी गोमेकॉत (गोवा मेडिकल कॉलेज) मध्ये हलविण्यात आले, जेथे तिचा उपचार चालू असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या वृत्तप्रप्रमाणे मुलगी अल्पवयीन होती आणि ती घरकामाला होती हे आढळून आले. तिला अचानक रक्तस्त्राव कसा चालू झाला आणि उपस्थितांनी तिच्यासाठी झटपट पावले का उचलली नाहीत व तिचा मृतदेह पालकांबरोबर गावी का पाठवून दिला? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत पण पोलीस मात्र या बाबतित चुप्पी साधून बसलेले दिसत आहेत.
दक्षिण गोवा येथील सवेरा संघटनेने या प्रकरणात आवाज उठवला आणि पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातांवर गुन्हा दाखल करावा व घरातील पुरुषांची डीएनए चाचणी करावी अशी मागणी केली आहे. पोलीस शवविच्छेदनाचा अहवाल देण्यास टाळाटाळ का करत आहेत असा प्रश्न सवेरा संघटनेच्या संस्थापक श्रीमती तारा केरकर यांनी केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार सदर मुलगी हि गर्भवती होती असे समजते पण जर हे सत्य आहे तर मग ती प्रसूत झाली होती का? का तिचा गर्भपात करण्यात आला? प्रसूती झाली असेल तर तिचे बाळ कोठे आहे? हे सर्व प्रश्न अजून पर्यंत उलगडलेले नाहीत. कोलवा पोलीस या विषयात कधी बोलणार? यामध्ये घातपात झाला आहे का याचा शोध कोण घेणार?