रेडी-गावतळे येथील २२ वर्षीय नेहा नंदकुमार राणे हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा हीने घरात कुणी नसल्याचे पाहून दुपारच्या वेळी आपल्या स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली. गावतळे येथील नेहा ही गोव्याला कामाला होती. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने ती घरीच होती. वडील दोडामार्ग येथे कामाला गेले होते. तर मोठा भाऊ बाहेर गेला होता आणि आई विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. घरात कुणी नसल्याचे पाहून नेहा हिने गळफास लावून घेतला.
बाजूच्याना हा प्रकार कळताच रेडी पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तिच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.