Home | न्युज | गोवा | गोव्यात एकाच दिवसात कोरोनाचे ६ बळी, आत्तापर्यंत एकूण 35 रुग्णांना मरण, १४ वर्षाची मुलगी सर्वात लहान

गोव्यात एकाच दिवसात कोरोनाचे ६ बळी, आत्तापर्यंत एकूण 35 रुग्णांना मरण, १४ वर्षाची मुलगी सर्वात लहान

Covid deaths in Goa

गोव्यात आज एकाच दिवसात कोरोनामुळे सहा लोकांचा जीव गेला. आरोग्य खात्याच्या बुलेटिननुसार आज वास्को येथील 14 वर्षाच्या मुलीचा कोविडमुळे मृत्यू झाला. कोविडमुळे मृत्यू झालेल्यामध्ये ही सर्वात कमी वयाची रुग्ण होती. तीला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या मुलीला किडनीचा त्रास होता. 

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. वास्को येथील मुली व्यतिरिक्त वास्को, चोडण , साखळी विर्डी, झुवारींनगर येथील अन्य पाच मृत व्यक्‍ती आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मरण आलेल्यांचा आंकडा 35 इतका झाला आहे. 

कोरोनामुळे  शनिवारी सकाळी मरण आलेल्या  मृतांपैकी चोडण येथील 80 वर्षीय महिला,   वास्को येथील 65 वर्षीय महिला, साखळी येथील 85 वर्षीय पुरुष, झुवारिनगर येथील 54 वर्षीय पुरुष व नवे वाडे येथील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

चोडण येथील  80 वर्षीय मृत कोरोनाबाधित महिलेला काही दिवसांपासून ताप  येत होता.  तिला बांबोळी येथील गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या कोरोना पोझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्यांना मडगाव येथील कोवीड इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान तिचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या महिलेला रक्‍तदाब तसेच मधुमेहाचा त्रास होता. 

वास्को येथील 65 वर्षी मृत कोरोनाबाधित महिलेला सुध्दा काही दिवसांपासून ताप येत होता. तिला 11 जुलै रोजी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. साखळी येथील 85 वर्षीय मृत कोरोनाबाधित रुग्णावर सुध्दा कोवीड इस्पितळात उपचार सुरू होते. नवे वाडे येथील रुग्णाला मडगाव इ एस आय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याला शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास मृत्यू आला. 

झुवारीनगर येथील एका 54 वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया होता, अशी माहिती मिळाली आहे. 

राज्यात दररोज कोरोनामुळे मृत्यूचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top