Home | न्युज | गोवा | मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षीय चंद्रकांत सावंत गोव्यातील कोरोना व्हायरसचा पहिला बळी

मोर्ले सत्तरी येथील ८५ वर्षीय चंद्रकांत सावंत गोव्यातील कोरोना व्हायरसचा पहिला बळी

First death of Covid-19 in Goa

उत्तर गोव्यातील मोर्ले, सत्तरी येथील चंद्रकांत सावंत या 85 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी कॉविड -१९ च्या संसर्गामुळे झाला. यापूर्वी कोरोनाव्हायरस प्रकरणातून मुक्त झालेल्या गोव्यामध्ये आता जवळजवळ 800 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत आणि आता त्यात एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्लेची दुर्घटना टाळणे फार कठीण होते. कारण संसर्ग शरीरात पसरला होता आणि सदर इसम चार वर्षांपासून अंथरुणावर  होता.

इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, मोर्ले सत्तरीचा हा व्यक्ती कोविड पीडित असल्याने त्याला मडगावच्या इ एस आई च्या कोविड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. काही काळानंतर त्याची तब्बेत बिघडल्याने त्याला ICU मध्ये हलविण्यात आले परंतु संसर्ग अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याने तेथेच त्यांचा मृत्यु झाला. 

मोर्ले हे गाव वाळपइ मतदारसंघातील आहे जे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मतदारसंघात येते.  सत्तरी येथे कोविड -१९ च्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते.

हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालानुसार, राज्याचे आरोग्यमंत्री आणि वाळपई मतदार संघाचे आमदार  विश्वजित राणे यांनी आपल्या मतदारसंघातील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या ऑडिओ निवेदनामध्ये त्यांनी म्हटले , “आज आमच्या मतदारसंघातील मोर्लेमधील 85 वर्षांचा व्यक्तीला कोविड-१९ च्या आजाराने मृत्यु आला. राज्यात प्रथम मृत्यूची नोंद झाली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. ”

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, रुग्ण गेल्या चार वर्षांपासून अंथरुणावर होता आणि त्याला सीओपीडी (क्रॉनिक अवरोधक फुफ्फुसीय रोग) होता “सुरवातीला हा कोविड-१९ चा संशयास्पद प्रकार होता त्यामुळे आम्ही त्याला ईएसआय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आधीच खूपच नाजूक होती परंतु नंतर ती जास्त नाजूक होत गेली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यु झाला.” असेही सावंत म्हणाले.

अंतिम संस्कारासाठी मृतदेह त्याच्या कुटूंबियांकडे सुपूर्द केले जाईल की नाही याबद्दल जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नकारार्थी उत्तर दिले आणि सांगितले, की प्रोटोकॉलचे कठोर पालन केले जाईल आणि त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार आरोग्य विभागातर्फे केला जाईल. “आमचा आरोग्य विभाग याची काळजी घेत आहे. त्याचे शरीर प्लास्टिकमध्ये गुंडाळले जाईल आणि कोणालाही त्याच्या अंगाला स्पर्श होऊ देणार नाही, ”असेही ते पुढे म्हणाले.