Home | न्युज | गोवा | कळंगुटेंचे आमदार मायकेल लोबो यांची पत्रकारांशी गैरवर्तवणूक, चित्रीकरण डीलीट करण्यास लावले

कळंगुटेंचे आमदार मायकेल लोबो यांची पत्रकारांशी गैरवर्तवणूक, चित्रीकरण डीलीट करण्यास लावले

Michael Lobo

मंत्री मायकल लोबो यांनी एका पत्रकाराला दमदाटी करून चित्रीकरण डीलीट करण्यास लावल्याबद्दल शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी निषेध व्यक्त केला आहे. कामत यांनी शुक्रवारी जारी केलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

पेढे म्हापसा येथील एका ईमारती बाहेर मंत्री मायकल लोबो, म्हापसाचे आमदार जोशुआ डीसुझा आणि हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो काही सरकारी अधिकाऱ्यांसमवेत आले होते. 

लोबो यांची म्हापसा मतदारसंघात होणारी दखलअंदाजी  जोशुआ यांना खुपते आणि या कारणांस्तव त्यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. दोघेही एकत्र येणं हे कुतूहलीचे कारण बनल्याने म्हापसातील बहुतेक पत्रकारांनी धाव घेत चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. 

त्यातील एका पत्रकाराला मायकल लोबो यांनी बोलवून दमदाटी केली आणि सांगितले की आपण गेल्यानंतर जेवढे चित्रीकरण करायचे असेल तेवढे करा. अशा प्रकारे पत्रकारांना धमकविण्याचे प्रकार लोकशाही विरोधी असुन लोबोंनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी कामत यांनी केली आहे. माननीय राज्यपाल सत्यपाल मलीक यांनाही ई-मेल द्वारे सदर घटना कळविणार असल्याचे कामत यांनी सांगितले. 

काही दिवस आधी एका पत्रकाराला पोलिस स्थानकात डांबून ठेवण्यात आले होते अशा प्रकारे लोकशाहीतील स्थंभ कमकुवत करणे थांबले पाहिजे नाहीतर लोकशाही धोक्यात येणार असल्याचे कामत यांनी व्यक्त केले आहे. 

सोशल मीडिया हे अफवा, चुकीच्या बातम्या आणि द्वेष पसरविण्याचे साधन बनले आहे पण प्रसार माध्यमांची विश्वासाहर्ता अबाधित आहे आणि त्यांना मान देणे हे लोकशाहीतील प्रत्येक घटकाचे कर्तव्य असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे. 

गोव्यातील बहुतेक आमदार हे हल्ली दादागिरीची भाषा वापरताना दिसतात त्यांना गोमंतकीय २०२२ मध्ये योग्य धडा शिकविणार असल्याचे कामत यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *