Home | न्युज | गोवा | स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता

स्वप्नील वाळकेचा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाल्याची शक्यता

Swapnil Walke Murder Case

स्वप्नील वाळकेच्या खुनशी संबंधित असलेले सर्व आरोपी अखेर गजाआड झाले असले तरी अजून पर्यंत खुनामागचा उद्देश्य समोर आलेला नाही आणि हा खून चोरीच्या सोन्याच्या व्यवहारातून झाले असल्याची शक्यता पोलीस तपासात समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल वाळके हत्येप्रकरणाचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून, चोरीच्या सोन्याशी संबंधित असलेल्या विक्रीच्या व्यवहारामुळे हा खून झाला आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे. 

सूत्रांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात अंजुना येथे झालेल्या दीड कोटी (1.5 Crore) रुपयाच्या सोन्याच्या लूटप्रकरणी आरोपी ओंकार पाटीलला पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्चर्याची गोस्ट म्हणजे दुसरा आरोपी एव्हंदर रॉड्रिगसही या गुन्ह्यात सामील होता.    

पोलिसांनी या खुनाचा संबंध हल्लीच गोव्याबाहेर झालेल्या १७ लाख रुपयाच्या सन्याच्या बिस्किशी पातळून पाहण्याचे ठरवले आहे कारण स्वप्नील वाळके हत्येचा या सर्व चोऱ्यांशी संबंध असणे नाकारता येत नाही असे पोलिसांना वाटते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गुन्हेगार, पाटील आणि रॉड्रिगस, हे खुनाच्या महिन्यापूर्वी मडगावमध्ये तळ ठोकून बसले होते आणि ह्याचा संबंध वाळके खुनाशी असण्याची शक्यता आहे असे पोलिसांना वाटते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील आणि रॉड्रिगस हे दोघे मडगाव मध्ये अंजुने येथून चोरलेल्या सोन्याचा व्यवहार मृत वाळकेशी करत होते का हे सुद्धा पोलीस तपासून पाहत आहेत. पोलीस वर्तुळात चर्चा आहे की जर चोरीला गेलेल्या देड कोटी सोन्याची जप्ती करण्यात अंजुने पोलिसांना यश आले असते तर कदाचित वाळके याची हत्या झाली नसती. 

मिळालेल्या माहितीनुसार अंजुने पोलिसांना फक्त लाख रुपयाचे सोने जप्त करण्यास यश आले होते. 

आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेले तिन्ही गुन्हेगार सांताक्रूझचे रहिवासी असून ते सर्व एकाच टोळीतील आहेत. महत्त्वाचे म्हणजे तिन्ही जणांवर वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत फौजदारी गुन्हे दाखल आहेत. या केसमधला तिसरा गुन्हेगार शेख हा मूळचा फकीराबंद झोपड्पट्टीतला असून त्याचे भाऊ आणि आई वडील तेथेच राहतात पण तो स्वतः काही वर्षांपूर्वी सांताक्रूझ मध्ये स्तलांतरित झाला होता. 

पोलीस रेकॉर्डानुसार काही काळापूर्वी ओल्ड गोवा मध्ये झालेल्या डबल मर्डर मध्ये शेख विरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला होता पण त्याला कलम ३०४ (culpable Homicide to murder) खाली फक्त तीन वर्षाची शिक्षा झाली होती जी संपवून तो काही वर्षांपूवी सुटला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील आहे ज्यामध्ये असे नमूद केलेले आहे की त्याच्यावर मानसिक आजारावर उपचार चालू आहेत, आणि अधिकाऱ्यांना वाटते की तो या खून प्रकरणात स्वताहाचा बचाव करण्यासाठी त्या प्रमाणपत्राचा वापर करेल पण या तपासाशी संबंधित असलेल्या स्तोत्रांना वाटते कि पोलीस तपासात याचा विपरीत परिणाम होणार नाही कारण हा गुन्हा पूर्वनियोजित होता आणि एखादा मानसिक रोगी ये करू शकत नाही.

या हत्येप्रकरणी तपास अधिकारी पीआय सी.एल. पाटील यांनी अन्य पोलिस अधिकाऱ्यांसह  रविवारी वाके यांच्या निवासस्थानाची तपासणी केली. दरम्यान, दक्षिण गोव्याचे एसपी पंकज कुमार सिंह यांनी दहा दिवसांच्या रजेवर गेल्यामुळे एसपी (सीआयडी) महेश गावकर यांना दक्षिण गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविन्यात आला आहे.