Home | न्युज | गोवा | गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर

गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार, तरुणी गंभीर

Accident at Lanja

गोवा मुंबई महामार्गावर हि दुर्घटना घडली ज्यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आणि दुचाकी मागे बसलेली तरुणीची स्तिथी गंभीर आहे असे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून एक कंटेनर भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने निघाला होता आणि जेव्हा तो लांजा येथे मोहोचला त्याने एका दुचाकीला जोराने धडक दिली ज्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. 

हि अपघाताची घटना दिनांक १४ रोजी रविवारी दुपारी 2.45 च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे येथील अमेय ढाब्यानजीक  घडली. कंटेनर व दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आणि दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाल्याची सूचना स्थानिक पोलिसांनी वृत्तपत्राला दिली.   

मिळलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव अजून कळलेलं नसले तर दुचाकीच्या मागे बसलेली तरुणीचे नाव मयुरी कांबळे असे सांगण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले 

दुचाकी अपघातानंरत कंटेनरखाली सापडल्याने 200 फूट फरफटत गेली आणि त्याचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कंटेनर (क्रमांक एम. एच.- 48, जे- 530) हा गोव्यावरून मुंबईच्या दिशेने निघाला होता. दुचाकी (क्रमांक एम. एच.-08-वाय-8664) लांजाच्या दिशेने जात होती. याच दरम्यान कंटेनरही देवधे येथील अमेय धाब्यानजीक आला असताना कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक बसली. कंटेनर विरुद्ध दिशेला जात असतानाच दुचाकी कंटेनरच्या मध्यभागी सापडली. यामध्ये दुचाकीचालक महामार्गाच्या मध्यभागी आदळून जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी महामार्गावर जोरदार आदळली. त्यानंतर तिला तत्काळ प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघाताची माहिती समजताच देवधे येथील तरुणांनी धाव घेऊन अपघातातील गंभीर जखमी असलेल्या तरुणीला उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा करून मृतदेह लांजा रुग्णालयात पाठवला.