Home | न्युज | गोवा | गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला

गाडीला आरसे बसवले नाहीत मग तयार राहा आरटीओ कडून दंड स्वीकारायला

Did not fix mirrors on your bike

आपण किती वेळा पाहिलं असणार लोक मोटोरबाइकला आरसे नसताना बिनधोकपणे चालवतांना मात्र आता ते महागात पडणार आहे. जर तुमच्या गाडीला आरसे बसवलेले नसतील तर आरटीओ तुम्हाला कमीत कमी ५०० रुपयाचा चालान देऊ शकेल. असे का? या लेखात सविस्तर वाचा.     

वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.वाहन चालकाने गाडी चालवताना नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची किंमत मोजावी लागेल.वाहनाला आरसा असणे सक्तीचे आहे.आरशाशिवाय गाड़ी चालवल्यास चालकाकडून तब्बल पाचशे रूपयांचा दंड घेतला जाईल.

वाहन चालवताना टोलनाक्यावर २०२१ पासून फास्टॅग अनिवार्य केला आहे. तसेच लायसन्स, कागदपत्रे, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र आणि वाहनांच्या दोन्ही बाजूला आरसे बंधनकारक आहे. हे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनांना आरसे नसल्याने बरेच अपघात होण्याची शक्यता दिसून येते.कारण आरसे नसल्याने मागची येणारी वाहने दिसत नाहीत.त्याचबरोबर मागे मान वळवून बघून मग वाहन चालवावे लागते, तसेच विनाआरशाची वाहने यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे असे नियम करणे आवश्यक आहे.

परिवहन विभागाकडून विना वाहन परवाना, फॅन्सी नंबर प्लेट याच्यावरही कारवाई करण्यात येते. त्याचबरोबर वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास चालकाला दंड भरावा लागतो. तसेच आता आरसे नसणार्‍या गाड्यांवरही कारवाई होणार आहे.

त्यामुळे चालकाने सतर्क रहाणे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.सुरक्षित अंतर व नियमांचे उल्लंघन न करणे यातच खरे शहणपण आहे.

Scroll to Top