Home | न्युज | गोवा | गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉव्हिडची लागण, फेसबुक पोस्ट मधून केला खुलासा

Dr Pramod Sawant on masks

गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना कॉव्हिडचा संसर्ग झाला असल्याची बातमी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून कळवली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी कोरोनाव्हायरस संसर्गाची सकारात्मक चाचणी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी होम आयसोलेशन पत्करले आहे.   

मुख्यामंत्र्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून वरून गोव्याच्या लोकांनां संदेश दिला  “मी माझ्या सर्व मित्रमंडळी आणि निकटवर्त्याना सांगू इच्छितो की मला कॉव्हिडची लागण झालेली आहे आणि मी इसिम्प्टोमॅटिक असल्याने होम आयसोलेशन पत्करले आहे आणि मी घरातूनच आपले काम करणार असून जे माझ्या संपर्कामध्ये आले आहेत त्यांनी आपली कॉवीड चाचणी करून घ्यावी.”     

मुख्यमंत्र्यांनी नेहमीच म्हणायचे ‘भीवपाची गरजा ना’ म्हणजे “भिण्याची काही गरज नाही” आणि आपण आपल्या कामाच्या निमित्ताने लोकांना भेटतो तेव्हा नेहमीच सोशल डिस्टंसिन्गला प्रद्यान्य देतो.    

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि अन्य आमदारांसह राज्यातील कोरोनाव्हायरस संसर्गासाठी इतर राजकीय नेत्यांनीही सकारात्मक चाचणी घेतली आहे. सर्वजण ठीक असल्याचे सांगितले जाते.

Scroll to Top