Home | न्युज | गोवा | गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश

गोव्यातील खासगी अथवा अनुदानित शैक्षणिक संस्थानीं दिव्यांगांना प्रवेश नाकारू नये, शिक्षण खात्याकडून निर्देश

Divyang Student

खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे दिसून आले आहेत. दिव्यांग व्यक्तींना प्रवेश नाकारणे हे दिव्यांग कायदा 2016 व शिक्षण हक्क कायदा 2009 चे उल्लंघन आहे. विद्यालयांना दिव्यांग व्यक्तींना विद्यालयात प्रवेश नाकारू नये, असे शिक्षण संचालनालयाकडून विद्यालयांना कळविण्यात आले आहेत. 

शिक्षण संचालक आमोणकर यांनी या संदर्भात सोमवारी परिपत्रक जारी केले. राज्यातील खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्रमुखांनी याची नोंद घ्यावी. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना ते दिव्यांग आहेत, या कारणावरून प्रवेश नाकारू नये, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. केवळ दिव्यांग असल्याने त्यांना प्रवेश नाकारू नये, असेही सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत असलेल्या डिसेबिलिटी रायट्स असोसिएशन (ड्रॅग) संस्थेकडे विद्यालयांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याच्या दहा तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सर्व विद्यालयांना दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार देऊ नये अशा आशयाचे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी  करावे, अशी मागणी ड्रॅग संस्थेतर्फे करण्यात आली होती. 

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क केला. त्यावेळी विद्यालयात रिसोर्स रूम नसल्याने त्यांच्या मुलांना प्रवेश मिळू शकणार नाही असे त्यांना सांगण्यात आले होते, अशी माहिती  ड्रॅग संस्थेचे अवेलिनो डिसा यांनी दिली होती.

Scroll to Top