Home | न्युज | गोवा | राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली, कायदा व सुव्यवस्था कोसळली, पण भाजप सरकार उत्सव साजरा करते : दिगंबर कामत

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली, कायदा व सुव्यवस्था कोसळली, पण भाजप सरकार उत्सव साजरा करते : दिगंबर कामत

Digambar Kamat

राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली होतीच, सांताक्रुझ मध्ये टोळीयुद्धात एकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याच्या घटनेने आता कायदा आणि सुव्यस्था ही कोसळल्याचे उघड झाले आहे. परंतु, गोव्यातील भाजप सरकार उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केला आहे.

राजधानी पणजी जवळ असलेल्या सांताक्रुझ मध्ये भडलेल्या टोळीयुद्धात करंझळे येथील 25 वर्षीय सोनू यादव  याचा  गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेस उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जुने गोवे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यातील कायदा व्यवस्था बिघडण्यास सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

कामत म्हणाले,भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने अर्थव्यवस्था कोसळल्याने  विवंचनेत असलेल्या सामान्य माणसासमोर आता सुरक्षेचा नवा प्रश्न उभा राहिला आहे.

भाजप सरकारने उत्सव व प्रसिद्धीच्या आपल्या “व्हर्चुअल विश्वातुन” बाहेर पडावे व राज्यातील सत्य परिस्थीतीला सामोरे जावे, असा टोला  कामत यांनी हाणला आहे. 

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी या घटनेची त्वरीत दखल घ्यावी व सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. आम्ही मागील कित्येक वर्षे सरकारला राज्यात वाढलेल्या गुन्हे, अमली पदार्थ व्यवहार, वेश्या व्यवसाय, बलात्कार व खुन या बद्दल जाब विचारत होतो व कारवाई करण्याची मागणी करीत होतो. परंतु, सरकारने दखल न घेतल्यानेच आज ही परिस्थीती समोर आली आहे,असा आरोप कामत यांनी केला.

अजुन वेळ गेलेली नसुन, आता तरी भाजप सरकारने योग्य कारवाई करावी व गोव्याला गुन्हेगारांचा अड्डा बनण्यापासुन रोखावे,अशी मागणी कामत यांनी केली आहे.

Scroll to Top