Home | न्युज | गोवा | मडगावच्या खासगी हॉस्पीटल मध्ये एकाचा मृत्यु, नातेवाईकांनीं ठरवले डॉक्टराला दोषी

मडगावच्या खासगी हॉस्पीटल मध्ये एकाचा मृत्यु, नातेवाईकांनीं ठरवले डॉक्टराला दोषी

Medical Negligence

शनिवारी दुपारी दक्षिण गोव्यातील माडगाव येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. ‘वैद्यकीय दुर्लक्ष’ झाल्याचा पवित्रा घेऊन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरना धारेवर धरले.  

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालांनुसार, मृत व्यक्तीच्या नातेवाईकानीं वैद्यकीय दुर्लक्ष केल्याचे सांगुन हॉस्पिटलला धारेवर धरले, आणि त्यांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.      

शनिवारी दुपारी दक्षिण गोव्यातील माडगाव येथिल खासगी रूग्णालयात तणावग्रस्त वातावरण पहायला मिळाले. मृताच्या नातेवाईक आणि मित्रांनी वैद्यकीय दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तथापि, वेळेवर पोलिस आल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत चिंचणीकर यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार गेले दोन दिवस त्याच्या उदरात तीव्र वेदना होत होत्या.  मात्र, दुपारपर्यंत त्यांची अनिश्चित परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

मृत व्यक्तीच्या कुटूंबाच्या मते, रूग्णाला हॉस्पिटल मधुन घेऊन जाण्यापुर्वी संपूर्ण रक्कम रुपये ४० हजार जमा करावेत असा आग्रह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी धरल्यामुळे रूग्णाला जीएमसीमध्ये हलविण्यात बराच विलंब झाला आणि त्यामुळे रुग्ण दगावला.   

नातेवाईकांनी सांगितले की, जीएमसीकडे जाण्याच्या मार्गावर रूग्णाला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात परत आणण्यात आले आणि काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला.

मृतांचे मित्र आणि नातेवाईक  रुग्णालयात जमले. त्यांनी रुग्णवाहिकेत आवश्यक साधन व उपकरणे नसल्याचा आरोप केला, ज्यामुळे चिंचणीकर यांचे प्राण गेले.

दरम्यान, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी  असा दावा केला आहे, की न्यूमोनियाच्या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Scroll to Top