Home | न्युज | गोवा | कोविडच्या काळात राज्यात परतलेले स्थलांतरित कामगार फिरतायत मोकाट

कोविडच्या काळात राज्यात परतलेले स्थलांतरित कामगार फिरतायत मोकाट

Migrant Returning Back to Goa

गोव्यात एकीकडे कोविडचा संसर्ग वाढत चालला आहे आणि  दुसरीकडे राज्यात आलेले स्तलांतरित कामगारवर्ग  स्वतःला विलग्न न ठेवता  सर्रास बाजारात आणि इतर सार्वजनिक स्थळी मोकाटपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे . या लोकांच्या अशा वागणुकीमुळे राज्यात कोविडच्या संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे. 

एम.एच. ए. च्या मार्गदर्शक तत्वां प्रमाणे गोव्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याला कोवीड-१९ संसर्गाची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार हे स्तलांतरित कामगार कोणत्याच नियमांचे पालन न करता मोकाट फिरत आहेत.        

हे प्रकरण लक्षात आल्यानंतर कुंकळीच्या काही रहिवाश्यांनी कुंकळी नगरपालिकेला स्थलांतरितांनी वेगवेगळ्या राज्यातून गोव्यात परतणाऱ्यां व्यक्तींबद्दल माहिती दिली. ते कोणत्याही प्रकारच्या चाचण्या शिवाय मुक्तपणे फिरत आहेत हे निदर्शनास आणून दिले. 

प्राप्त अहवालानुसार, कुंकळी नगरपालिकेने  तेथील औद्योगिक वसाहतीतीच्या व्यवस्थापनास याबद्दल विचारणा केली. तसेच त्यांना स्तलांतरित कामगारांवर नजर ठेऊन  दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करून कोविडची चाचणी करत आहेत कि नाही, ह्यावर लक्ष देण्यास सुचविले.  

या विषयावर चर्चा करण्यासाठी २६ जून रोजी औद्योगिक वसाहतीच्या फील्ड मॅनेजर यांना आपण आधीच पत्र लिहिले होते पण ती बैठक रद्द झाली, अशी माहिती सीएमसीच्या अध्यक्षा सुकॉरिना कुतीन्हो यांनी माध्यमांना दिली. पण “कोविड -१९ चाचणी घेतल्यानंतर फिल्ड मॅनेजरला घरी राहणे भाग पडल्याने ही सभा रद्द करण्यात आली,” असेही त्यांनी सांगितले. 

कुतीन्हो यांनीही एम.एच.एच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता शहरातील प्रवासी स्थलांतरित होण्याच्या अहवालाची पुष्टी केली. “जेव्हा ते सीमेवर पोहोचतात तेव्हा ते औद्योगिक वसाहतीच्या आत असलेल्या त्यांच्या कारखान्याचा पत्ता देतात, परंतु ते नगरपालिकेला व कारखानदारांच्या अधिकाऱ्याला माहिती दिल्या शिवाय इतरत्र फिरत राहतात. हे स्थलांतरित कामगार हा विषाणू पसरवू शकतात या भीतीमुळे कुंकळीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,” असे कुतीन्हो म्हणाले.

त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, गोव्यात प्रवेश करणारे स्थलांतरित लोक सात दिवसांच्या घरामध्ये राहण्याच्या नियमांचे पालन न करता मोकळेपणाने फिरत आहेत. हि गोष्ट कुंकळीच्या रहिवाश्यांनी नगरपालिकेच्या नजरेस आणून दिली.

दरम्यान, कुंकळीचे आमदार क्लाफॅसिओ डायस यांनी परप्रांतीयांनी आपापल्या कारखान्यांमघ्येच अलग राहण्याच्या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे , याची खात्री करुन घ्यावी अन्यथा कारखानदारांनी स्थलांतरितांसाठी मुक्कामाची व्यवस्था केली पाहिजे, असे सांगितले.

दरम्यान, कुंकळीमध्ये दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. बाळ्ळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता काकोडकर म्हणाल्या की, दोन्ही प्रकरणे आंबोली ​​गावाशी संबंधित आहेत.  कोंम्बा मधील वृद्धाश्रमात काम करणारी कोंबा येथील एक महिला आंबोली ​​येथील एका चॅपलमध्ये  प्रार्थना सेवेला गेली होती. येथील धर्मगुरूंना कोविडचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.   शुक्रवारी संपूर्ण महानगरपालिका व बाळी परिसराची स्वच्छता करण्यात आली, असेही कुंकळीच्या आमदारांनी  सांगितले.