Home | न्युज | गोवा | डिचोलीतील 1 वर्षाच्या बालकाला कोरोनाव्हायरसचा संसर्ग

डिचोलीतील 1 वर्षाच्या बालकाला कोरोनाव्हायरसचा संसर्ग

Coronavirus cases

सत्तरी तालुक्यात कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर उत्तर गोव्यात कोविड -१९ चे रुग्ण वाढत आहेत. डिचोलीमध्ये जवळपास १३ प्रकणांची नोंद झाली आहे. रविवारी त्यात आणखी तीन पॉझिटिव्ह प्रकरणांची भर पडली. ज्यात एका वर्षाच्या बालकाचाही  समावेश आहे. 

प्राप्त माहितीनुसार, डिचोली तालुक्यातील साळ गावात अलीकडे कोविड ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी सांगितले, की साळ येथील एका वर्षाच्या बाळाची  कोविड चाचणी पॉसिटीव्ह आली असून त्यामुळे गावात एकूण कोविडची संख्या चार वर पोचली आहे.

सूत्रांनि दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षाचे बाळ त्याच कुटुंबातील आहे, ज्यांना आधी कोविड चा संसंर्ग झाला होता. कोविड च्या वाढती संख्या लक्षात घेऊन संसर्ग रोखण्याच्या उद्धेशाने साळ गावातील प्रभाग ३  सील करण्यात आला आहे.     

दरम्यान, साखळी भागात असलेल्या देसाई नगरात आणखी दोन जणांना या विषाणूची लागण होऊन त्यांच्या कोविड चाचण्या साकारात्मक निघाल्यामुळे आता तेथे कोविडची संख्या ९ वर पोहोचली आहे.  अधिकाऱ्यांनी या  संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे.   

डिचोली सामुदायिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी सांगितले, की शनिवार व रविवारी अनेक लोकांचे स्वेब नमुने घेण्यात आले आणि त्यामध्ये एक पॉसिटीव्ह रुग्ण सापडला.  

सांखळीचे बाजारपेठ शुक्रवारपासून ताळेबंदीत आहे.  म्हणूनच सरकारने सांखळीतील लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्याच्या सर्व तरतुदी केल्या आहेत. सांखळीचे आमदार  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेने सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Scroll to Top