Home | न्युज | गोवा | सांताक्रूझ शूटआऊट एका महिलेवरील प्रेमप्रकरणाचा परिणाम

सांताक्रूझ शूटआऊट एका महिलेवरील प्रेमप्रकरणाचा परिणाम

Shootout at St Cruz

विरोधी गटातील दोघांना एका महिलेवर प्रेम होते आणि दुर्दैवाने हेच सांताक्रूझ येथील इम्रान बेपारी यांच्या घरी शूटआऊट होण्याचे कारण बनले आहे. त्यातच  हल्लेखोरांच्या टोळीतील एका सदस्याचा मृत्यू झाला. चुकून त्यांनी आपल्याच एका साथीदाराला ठार मारले, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले.

सांताक्रूझ मध्ये झालेल्या शूटआऊटच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरवून गेले आहे. तेव्हापासून विविध षडयंत्र सिद्धांतांचे अनुमान लावले जात आहे. परंतु प्रत्यक्षात ही गोष्ट काही वेगळी होती आणि हे गुन्हेगार एका महिलेसाठी  भांडत होते.

टाइम्स ऑफ इंडिया च्या अहवालानुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास सांताक्रूझमध्ये झालेला शूटआऊट म्हणजे मूळ प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांचे एका महिलेवर असलेले प्रेमाचे निष्पन्न होते.

वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे, वेगवेगळ्या गटांतील दोघा जणांची एकाच महिलेवर नजर होती आणि हा वाद एकमेकांनां धमक्या देण्यापासून सुरु झाला.   

सविस्तर माहिती अशी की, हल्ल्यानंतर पोलिसांनी टोळीच्या सुमारे 10 जणांना गजाआड केले आणि तेथून तपास सुरू झाला. चौकशी दरम्यान टोळीतील सदस्यांनी दिलेल्या जबानीत दोन टोळीतील मुलांचे एकाच महिलेवर प्रेम असल्याचे उघड झाले. ज्यावर बेपारी टोळीची नजर होती त्याच मुलीवर हल्लेखोरांच्या टोळीमधील एका मुलाची नजर होती.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या टोळीने बेपारी टोळीच्या मुलाला त्या महिलेपासून दूर राहण्याची धमकी दिली होती पण त्याने त्याची गय केली नाही आणि ह्या गोष्टीचा परिणाम दोन गटांत शीतयुद्धात झाला.

आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या भावासोबत इम्रान बेपारी गटाने यापूर्वी आरोपींना भेट दिली होती आणि या विषयावर दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली होती. नंतर हीच बाब या मोठ्या घटनेचे कारण ठरली. 

पोलिसांनि दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी हा कोणत्याही एका विशिष्ट गटाचा नसून त्याचा अनेक गटांशी संबंद आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबांनुसार हल्ल्याच्या अगोदर दोन्ही गटात धमक्यांचे सत्र चालू झाले होते. ते मोबाईलवरून एकमेकांना व्हिडिओ वरून धमक्या देत होते. 

उत्तर गोवाचे एसपी उत्करिष्ट प्रसून यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस या प्रकरणातील आणखी तीन आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींनी देशी बंदुकीचा वापर केला ज्यामधून सहा राऊंड फायर करण्यात आले. बंदूक हि परवाना रहित आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Scroll to Top