Home | न्युज | गोवा | शूट आऊट ऍट सांताक्रुझ – सहा राउंड फायर गोळीबारात टोळीतल्या एका गँगस्टरचा मृत्यु

शूट आऊट ऍट सांताक्रुझ – सहा राउंड फायर गोळीबारात टोळीतल्या एका गँगस्टरचा मृत्यु

Shootout at St Cruz

मागील आठवड्यात शनिवारी भल्या पहाटे सांताक्रुझ येथे झालेल्या गोळीबारात एका गँगस्टरचा गोळी लागुन मृत्यु झाला. नुकत्याच झालेल्या शूटआऊटच्या घटनेमुळे प्रशासन व पोलिसांच्या इंटेलिजन्स सिस्टमवर प्रश्नचिन्ह  उभा राहिला आहे. त्यांना या घटनेविषयी काहीच सुगावा नाही असे दिसून आले आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० मुखवटाधारक व्यक्तींच्या टोळीने इम्रान बेपारीच्या घरावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या माणसावर हल्ला झाला तो स्वतः एक अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याच्या नावाने शहरातील पोलीस स्थानकात अनेक गुन्हें नोंद आहेत.  

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जो या हल्ल्यात ठार झाला तो त्याच टोळीचा एक सदस्य होता आणि त्याला चुकून गोळी लागली. 

टोळीच्या सदस्यांनी बेपारीच्या घरावर हल्ला केला आणि घराबाहेर असलेल्या मोटारींचे नुकसान केले. सुमारे 6 राऊंड फायर करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक उत्कर्ष प्रसून यांनी दिली.

बेपारीच्या घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारींचे नुकसान केल्यानंतर त्यांनी वाहनांवर आणि बेपारीच्या घरावर सहा राऊंड फायर केले. पहाटे तीनच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे 10 मुखवटा घातलेले लोक या घटनेत सामील असल्याचे फुटेज दाखवते.

पत्रकारांशी बोलताना उत्तर गोवा पोलिस अधीक्षक (एसपी) उत्कृष्ट प्रसून म्हणाले, की गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख सोनू यादव, सांत इनेज अशी आहे.

“त्याच्याच टोळीच्या सदस्याने गोळ्या झाडल्यामुळे  एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहोत, ” असेही प्रसून म्हणाले.

विरोधी पक्षनेते  दिगंबर कामत यांनी ट्विटरवरुन सांगितले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, आता राज्यातील अर्थव्यवस्था कोसळल्यानंतर कायदा व सुव्यवस्था देखील कोलमडली आहे.

“सांताक्रूझमध्ये एकाच्या मृत्यूने गँग युद्धाचे त्रासदायक अहवाल. दुर्दैवाने गोव्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सेलिब्रेशन मोडमध्ये आहेत आणि आता गोव्याला फक्त देवच तारू शकतो.  गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. श्री. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कारकिर्दीत कठोर कारवाई करून शहरातून गुंडांचा नाश केला होता, परंतु बराच काळ लोटला आहे आणि  आधीचा काळ पुन्हा परत येत आहे हे सांताक्रुझ मध्ये झालेल्या घटनेतून स्पष्ट दिसून येते, असेही कामत पुढे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *