Home | न्युज | गोवा | बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी

बिएनआय गोवा सोबत व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला नवी भरारी

Vocal For Local Webinar

Panaji – Goa : महामारीच्या सुरवातीपासून स्थानिक उद्योगांना चालना देण्याची कल्पना उदयास आली आणि कालांतराने संपूर्ण देशात हे एक महत्त्वाचे ब्रीदवाक्य बनले. ज्या छोट्या व्यापारांना उत्पन्नात मोठा फटका बसला त्यांना मदत करण्याच्या हेतूने स्थानिक माल स्वीकारावा ही कल्पना  उदयास आली. आपल्या राज्यातही विविध प्रकारच्या स्थानिक ब्रँडच्या वापरात आणि जाहिरातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, या व्यापारांच्या उन्नतीसाठी बीएनाय गोवा महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.त्यामुळे बीएनाय गोव्याच्या व्यापार वृद्धी संघाच्या पुढाकाराने त्यांच्या सभासदांना नवीन व्यापार जोडण्यास मदत व्हावी याकरीता वेगवेगळी सत्रे आयोजित केली जात आहेत.

नुकतेच गोव्यासाठी पहिल्यांदा भारताच्या सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) आणि बिएनआय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नोंदणी प्रक्रिया-ओएनजीसीचे विक्रेते कसे व्हाल’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल या घोषणेला अनुसरून हे वेबिनार आयोजित करण्यात आले होते.जरी ओएनजीसी आयपीएसईएम नवीन कॉम्प्लेक्स घेऊन येत आहे,ओएनजीसी आयपीएसईएम गोवा ही प्रमुख सरकारी कंपनी असल्याने स्थानिक विक्रेत्यांशी संबंध जोडत आहे.ओएनजीसी आणि बीएनआय संस्थेची बैठक मयुरी भाटे आणि अरमान बंकले यांनी या भागासाठी असलेल्या बीएनआय मॅथग्राम अध्यायातील उद्योजक नेतृत्व संघाच्या साहाय्याने सुरू केली.

या दोन वेबिनारमध्ये ओएनजीसी मधील प्रख्यात वक्त्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ओएनजीसचे कार्यकारी संचालक व आयपीएसएचईएमचे प्रमुख अतुल गर्ग,आयपीएसएचईएमचे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश जिंदाल,आयपीएसएचईएमचे मुख्य व्यवस्थापक पुनीत खन्ना या मान्यवरांनी कंपनीचा आगाऊ प्रकल्प व स्थानिक विक्रेत्यांसोबत भागीदारी करण्यासाठी लागणारी मदत याविषयी समजावून सांगितले.

या सत्रामध्ये नोंदणीची प्रक्रिया ओएनजीसीच्या निविदा प्रक्रियेत कसे सहभागी व्हावे याविषयी समजावून सांगण्यात आले.यावेळी बीएनआयचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत यांनी बीएनआयच्या सर्व विक्रेते एकाच छताखाली उपलब्ध आहेत या क्षमतेचे कौतुक केले,बीएनआय दक्षिण गोव्याचे एरिया मॅनेजर पराग लोलियेकर यांनी सांगितले की बीएनआयचे सदस्य निवडताना निवड समिती गरजू स्थानिक विक्रेत्यांना निवडून त्यांचेच समर्थन करते.त्यांच्या मते अशा उपक्रमांमुळे स्थानिक व्यापारांमध्ये वाढ होईल व यामुळे राज्याच्या अर्थव्यवसस्थेला मदत होईल

वेबिनराला मिळालेल्या प्रतिसादामुळे ओएनजीसीची टीम समाधानी असून भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास उत्सुक आहे.

Scroll to Top