Home | न्युज | देश | हरियाणा रोहतकची गीता अरोरा कशी बनली दिल्लीची लेडी डॉन ‘सोनू पंजाबन’

हरियाणा रोहतकची गीता अरोरा कशी बनली दिल्लीची लेडी डॉन ‘सोनू पंजाबन’

Sonu-Punjaban Main

गुन्हेगारीचे विश्व हे बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित करते. मात्र, त्यांना एका गोष्टीची माहिती नसते आणि ती म्हणजे या विश्वातून माघे परतण्याचा मार्ग नेहमीच बंद असतो. असंच काहीतरी नेमकं गीता अरोराच्या संदर्भात घडलं असावं. रोहतक हरयाणाची गीता अरोरा हि आपल्या वडीलांबरोबर दिल्लीत स्तलांतरित झाली आणि तेथूनच तिचे  गुन्हेगारीच्या विश्वात पदार्पण झाले. चला तर बघूया कशी बनली रोहटकची गीता अरोरा दिल्लीची लेडी डॉन ‘सोनू पंजाबन’. 

गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन हे नाव बहुतेकांना तसे नवीन वाटणार नाही, कारण तिची चर्चा आज सगळ्या बातमी पत्रात भरभरून होत आहे. सोनू उर्फ गीता हि रोहतक मधून दिल्लीला तिच्या वडिलांबरोबर आली आणि १० वि पास झाल्यानंतर गीताने दिल्लीत ब्युटीपार्लर उघडले आणि इथूनच तिचे गुन्हेगारीच्या जगात पदार्पण झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत ब्युटी पार्लर चालवताना तिचे धागेदोरे गुन्हेगारी विश्वतील विजय नावाच्या गॅंगस्टरशी जोडले गेले आणि त्यातूनच तिचे नाव एका हत्येशी जोडले गेले. त्यानंतर तिच्याकडे परतीचा मार्ग राहिला नाही आणि तिने त्याच गँगस्टर विजयशी लग्न केले. 

गीताची गुन्हेगारी जगातील वाटचाल जी १९९८ साली सुरु झाली होती ती आत्ता संपुष्टात आली, जेव्हा दिल्लीच्या हायकोर्टने तिला एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणात आणि  तिला वैश्यवृतीच्या मार्गाला लावण्यासाठी २४ वर्षाची शिक्षा सुनावली. हे पाहिलांदाच घडले जेव्हा गीता कायद्याच्या कचाट्यात सापडली नाहीतर प्रत्येक वेळी ती गुन्ह्यातून अतिशय साहजिकरीत्या निसटत आली.   

Geeta Arora alias Sonu Panjaban coming out of the court

विजयशी प्रेम विवाह केल्यानंतर तिचे संपूर्णपणे गुन्हेगारीच्या विश्वात पदार्पण झाले आणि तेथून सुरवात झाली गुन्हेगारीच्या विश्वात गीताची वाटचाल. गीता आणि विजयच नातं जास्त काळ टिकून राहू शकलं नाही. कारण विजयचा संबंध यूपीचा डॉन प्रकाश शुक्लाशी होत आणि १९९८ साली पोलिसांनी प्रकाश शुक्लाला एन्काऊंटर मध्ये संपवल्यानंतर विजयलाही हापूडा एन्काऊंटरमध्ये धाराशाही केले.   

विजय गेल्यानंतर गीता परत एकदा एकटी झाली आणि तिने दीपक नावाच्या अपराध्याशी संबंध जोडले. पण पोलिसांनी दीपकलाही एका एन्काऊंटर मध्ये ठार केले. 

मिळालेल्या माहितीनुसार दीपक गेल्यानंतर गीताने त्याचाच भाऊ हेमंत सोबत लग्न केले आणि येथूनच तिला सोनू पंजाबन हे नाव मिळाले. पण हे लग्न देखील जास्त दिवस टिकले नाही आणि २००६ मध्ये हेमंतचा देखील एन्काउंटर झाला. 

हेमंतनंतर सोनू पंजाबनची अशोक बंटीसोबत जवळीक वाढली. ज्याने तिला सेक्स रॅकेट चालवण्याची आयडिया दिली. काही काळाने अशोक देखील पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये मारला गेला. पण तोपर्यंत सोनुने गुन्हे जगतात एक वेगळी ओळख बनवली होती आणि तिला थांबवणे अतिशय कठीण होते.      

गीताचं सेक्स रॅकेट मध्ये पदार्पण तिला गुन्हेगारीच्या जगात अतिशय खोलवर घेऊन गेलं होतं आणि तेथून परतीचा मार्ग बंद पडला होता. 

Richa Chaddha as Bholi Panjaban

Richa Chaddha as Bholi Panjaban in Fukrey

गुन्हेगारी विश्वाचा चटका सोनूला लागला होता आणि तिला माहित होते कि हे विश्व  नाव आणि पैसा दोन्ही मिळवून देणार आहे. गीता आता गुन्हेगारी विश्वात सोनू पंजाबन नावाने प्रसिद्ध झाली. इतकेच नाही तर बॉलीवूड मध्ये तयार झालेल्या फुकरे या चित्रपटातील  भोली पंजाबान हे पात्र ज्याला पडद्यावर ऋचा चड्ढा हिने साकारले आहे, हे खऱ्या आयुष्यात सोनू पंजाबन हिच्यापासून प्रेरित आहे.    

गुन्हेगारीची दुनिया कितीही मोठी असली तरी ती जास्त काळ टिकत नाही आणि गीताबरोरही तेच घडले. 

२०१७ मध्ये गीता एका गुन्ह्यात आरोपी सिद्ध झाली आणि यावेळी तिला बेल मिळाली नाही आणि शेवटी न्यायालयाने तिला एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणात आणि तिला वैश्यवृत्ती मध्ये ढकलण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली २४ वर्षांची शिक्षा सुनावली. 

३५ वर्षीय गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबन हिला तिचा साथीदार संदीप सोबत एका १२ वर्षीय मुलीच्या अपहरण, बलात्कार प्रकरणात कोर्टने दोषी ठरवले आणि त्यांना २४ वर्षासाठी कोठडी सुनावली. 

आता कदाचित गीता उर्फ सोनू सुप्रीम कोर्टमध्ये अपील करेल आणि परत बाहेर येऊन त्याच विश्वात जाण्याचा प्रयत्न देखील करेल, कारण जो एकदा या विश्वात शिरला त्याला परतीचा मार्ग नाही.