अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबी एक टीम या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी हल्लीच गोव्यात येऊन गेली होती, आता त्यांना या प्रकरणात नवीन धागेदोरे सापडल्याने त्यांनी आपली दिशा बंगळूरकडे वळवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या टीमनं सुशांत प्रकरणी अंमली पदार्थांचा व्यापार आणि सेवन या आरोपाखाली अनेकांना अटक केली आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेकांची याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता ड्रग प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीला अटक केलं आहे.
बंगळुरूची केंद्रीय गु.न्हे शाखाही कन्नड चित्रपट सृष्टीतील अंमली पदार्थांचं सेवन आणि व्यवसाय प्रकरणाचा तपास करत आहे. अंमली पदार्थ प्रकरणात सीसीबीनं शुक्रवारी सकाळी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी छापा टाकला. तसेच शुक्रवारी दुपारी रागिणीला सीसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. तपासादरम्यान रागिणी द्विवेदी विरोधी पुरावे मिळाल्यानं सीसीबीनं रागिणीला अटक केली आहे.
अभिनेत्री रागिणी द्विवेदीसह या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. राहुल आणि विरेन खन्ना असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच पोलिसांनी गुरुवारी रविशंकर नावाच्या अन्य एका आरोपीलाही अटक केली आहे. बंगळुरू गुन्हे शाखेचे संयुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
‘अभिनेत्री रागिणी द्विवेदीला ड्रगप्रकरणी अटक केलं गेलं आहे. तसेच खन्ना नावाची व्यक्ती मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करत होता. खन्ना पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ उपलब्ध करून देत होता. दिल्लीत राहणाऱ्या खन्नाला सीसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अटक केली आहे,’ अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तसेच रियाचा भाऊ शौविक यांच्या मोबाईलमध्ये सीबीआयला ड्रग्जविषयीचं काही चॅट आढळलं होतं. यामुळे एनसीबीच्या एका टीमनं शुक्रवारी सकाळी रियाच्या घरावर छापा टाकला होता. तसेच एनसीबीच्या दुसऱ्या टीमनं रियाच्या कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरावर छापा टाकत सॅम्युअलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
एनसीबीच्या टीमनं एकसाथ दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू ठेवलं होतं. तपासादरम्यान एनसीबीला शौविक आणि सॅम्युअल विरोधी पुरावे मिळाल्यानं काल दोघांना अटक केलं आहे. आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान सॅम्युअल आणि शौविकला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सॅम्युअल आणि शौविकच्या चौकशीसाठी एनसीबी न्यायालयाला कोठडीची मागणी करणार आहे. तसेच या दोघांसोबतच रियालाही अट.क केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Source: Maharastra Kesari