Home | न्युज | देश | करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, च्यवनप्राश खा आणि हळदीचं दूध प्या – आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Coronavirus Infection

देशात करोनाने थैमान घातलेले आहे पण बरेच लोग या आजारातून मुक्त देखील झालेले आहेत आणि देशाच्या आरोग्य मंत्रालयाने अशा करोनमुक्त नागरिकांना च्यवनप्राश खाण्याचा आणि दूध बरोबर हळद पिण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला पोस्ट कोविड -१९ व्यवस्थापनाचे ( post COVID-19 management protocol ) नियमाखली जाहीर करण्यात आलेला आहे.    

मिळाल्या माहितीप्रमाणे, करोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना अशक्तपणा, अंगदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणं यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा प्रकाराची संख्या मर्यादित असली तरीही आवश्यक ती पावलं उचलता यावी यासाठी संशोधन सुरू करण्यात आलं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या चोवीस तासात ७८,३९९ रुग्ण करोनमुक्त आहेत आणि त्याचबरोबर करोनापासून बरे होणार्यांची संख्या वाढून ३,७०२,५९५ वर पोहोचली आहे. 

काय आहेत नवीन प्रोटोकॉल? जाणून घ्या

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नवीन प्रोटोकॉलमध्ये या करोनामुक्त झालेल्या नागरिकांना च्यवनप्राश खाणं, हळद दूध पिणं, योग आणि फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांनी मास्क वापरण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितलं गेलं आहे. पुरेशा प्रमाणात गरम पाणी पिण्याचा सल्लाही मंत्रालयाने दिला आहे. याव्यतिरिक्त, आयुष मंत्रालयाने देखील रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेण्यास सांगितलं आहे. 

सर्व करोनमुक्त लोकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे 

– मास्क घालणं, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं

– पुरेसं गरम पाणी पिणे 

– आयुर्वेदिक औषधांचे सेवन करणे 

– घरातील काम सुरू ठेवा, व्यावसायिक कामं हळूहळू सुरू करा 

– योग, प्राणायाम ध्यानासारखे नियमित व्यायाम करा

– डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार श्वासोच्छ्वास करण्याचा व्यायाम करा

– सकाळ आणि संध्याकाळ चालत राहा 

– ताजे शिजलेले अन्न खा, अधिक पौष्टिक आहार घ्या, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.

– मद्यपान अथवा धुम्रपान करू नका 

– आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्या. शरीराचं तपमान मोजणे, रक्तदाब तपासणे आदि चालू ठेवा 

– जर घसा कोरडा असेल तर गरम पाण्याची वाफ घ्यावी किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करा

आपला अनुभव इतरांनाही सांगा

जागरुकता वाढवण्यासाठी करोनामधून बरे झालेले रुग्ण आपला अनुभव मित्र, नातेवाईकांसह सांगू शकतात. यासाठी तुम्ही सोशल मीडियासह इतर माध्यमांचा उपयोग करू शकता. करोनामुक्त झाल्यावर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर नागरिक ७ दिवसांनी फोनवरून किंवा इतर मार्गांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादी व्यक्ती जर घरातच आयसोलेशनमध्ये असेल आणि स्थिती आधीच खराब असेल तर जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क साधा.

यांचे सेवन करा, मंत्रालयाचा सल्ला 

– रोज आयुष क्वाथ (१५० मिली, एक कप) 

– समशामनी वटी, दिवसातून दोनदा (५०० ग्रॅम)

-गिलोए पावडर, १५ दिवसांसाठी १ गरम पाण्यातून १-३ ग्रॅम 

– अश्वगंधा, दिवसातून दोन वेळा (५०० ग्रॅम)

– अश्वगंधा पावडर, १५ दिवसांसाठी गरम पाण्यातून दिवसातून दोन वेळा १-३ ग्रॅम 

– आवळा किंवा आवळा पावडर (दररोज १ ते ३ ग्रॅम) 

– कोरडा खोकला झाल्यावर मुलेठी पावडर ( कोमट पाण्यात १-२ ग्रॅम ) दिवसातून दोन वेळा 

– सकाळी आणि संध्याकाळी गरम दूध, अर्धा चमचा हळद घालून प्या. कोरड्या खोकल्यासाठी

– हळद आणि मीठ पाण्याने गुळण्या करा

– दररोज एक चमचा च्यवनप्राश खा

Scroll to Top