Home | न्युज | देश | रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

रेल्वेचा प्रवास होणार आता आणखी जास्त आरामदायक; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Railway Travel

तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास केला असेल तर तुम्हाला माहित असेल कि “साईड लोव्हर बिर्थ” ने प्रवास करणे किती कटकटीचे आणि त्रासदायक ठरते पण आता ती सर्व कटकट संपणार आहे. भारतीय रेल्वे प्रवास आता जास्त आरामदायक होणार आहे कस? वाचा संपूर्ण रिपोर्ट येथे…     

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री,मा.पीयूष गोयल यानी ट्वीट केलेल्या वीडियो मधे रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास प्राप्त होण्याची चिन्हे दर्शविली. भारतीय रेल्वेने प्रवास करताना होणारा त्रास हा मुख्यतः ‘साईड लोअर बर्थ’चं आरक्षण असलेल्या प्रवाशांना करावा लागतो.पण, आता साइड लोअर बर्थने प्रवास करणारे प्रवासी कंबरदुखीची तक्रार करणार नाहीत. कारण, रेल्वे प्रशासनाने हे आसन आरामदायी बनवण्याची तयारी सुरू केली आहे. साइड बर्थच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले असून याबाबतचा एक व्हिडिओ केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शेअर केला आहे.

साइड लोअर बर्थने प्रवास करणाऱ्यांचा खऱ्या अर्थाने वेदनादायी प्रवास सुरू होतो, जेव्हा झोपण्यासाठी सीट एकमेकांना जोडले जातात. या प्रक्रियेमध्ये जोडलेले सीट खालीवर राहतात, त्यामुळे त्यावर झोपणाऱ्या प्रवाशांकडून नेहमी पाठदुखी, कंबरदुखीच्या तक्रारी केल्या जातात. सोशल मीडियवरही काही जणांनी तशाप्रकारची तक्रार केली होती. साइड लोअर बर्थ रिझर्व्हेशन अगेंस्ट कँन्सलेशन (आरएसी) प्रवाशांना दिलं जातं. अखेर रेल्वेने या सीटच्या व्यवस्थेत काही बदल केले आहेत. आता दोन्ही सीट जोडल्यानंतर त्यावर दुसरं एक आसन (सीट) टाकता येणार आहे. यामुळे प्रवाशांना झोपताना कोणताही त्रास होणार नाही.

पियूष गोयल यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करताना, “भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी प्रयत्नशील आहे… आसनांमध्ये केलेले काही बदल हे त्याचंच उदाहरण आहे. या बदलांमुळे प्रवाशांचा प्रवास अजून आरामदायक झालाय” असं म्हटलं आहे.

Image Creadits : TOI