Home | न्युज | शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर

शिर्डीमधून माणसं गायब कशी होतात? गेल्या 3 वर्षांतील धक्कादायक आकडेवारी समोर

People Started Disappearing From Shirdi

शिर्डीचे साईबाबा हे भारतातले अतिशय जागृत देवस्थान आहे आणि असे म्हणतात कि येथे आलेल्या माणसाची प्रत्येक मन्नत साईबाबा पूर्ण करतात. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर अली आहे आणि त्या माहितीनुसार अनेकजण शिर्डीमधून बेपत्ता होत असल्याच्या माहितीने सर्वीकडे एकच खळभळ माजवली आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे की काय? असा सवाल आता लोकांसमोर उभा राहेलला आहे. चला बघुयातर काय आहे याच्यामागचे रहस्य 

महाराष्ट्रातील लोकमत या पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीप्रमाणे अचानक समोर आलेल्या माहितीने भक्तजण धास्तावले आहेत आणि यामागे मानवी मानवी अवयव तस्करीचे काही रॅकेट (Human organ trafficking) आहे की काय? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता हे प्रकरण थेट  उच्च न्यायालयाने (High Court) पोहोचले आहे.    

मध्यप्रदेशातील इंदूर (Madhya Pradesh, Indore) येथील मनोज सोनी (Manoj Soni) यांची पत्नी दिप्ती सोनी (Dipati soni ) ही शिर्डीतून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली आणि स्वतःही अनेक ठिकाणी तीचा शोध घेतला. मात्र अजूनही ती सापडलेली नाही. शिर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनोज सोनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली यावेळी न्यायालयानेही पोलीस तपासावर ताशेरे ओढले आहे. शिर्डीतून बेपत्ता होणारी माणसे अखेर गेली कुठे? यात मानवी अवयव तस्करीचे रॅकेट आहे की काय? असा सवाल न्यायालयानेही उपस्थित केला आहे.

उच्च न्यालयाच्या आदेशावरून शिर्डी पोलिसांनी बेपत्ता झालेल्या महिला पुरूषांची यादी न्यायालयात सादर केली आहे. यात 3 वर्षातीलच बेपत्ता व्यक्तींचा आकडा थक्क करणारा आहे. वर्ष 2017 मध्ये 71 लॉग बेपत्ता झाले आणि त्यातले 20 अजूनही बेपत्ताच आहेत असे आढळून आले. 2018 मद्ये 82 बेपत्ता झाले 13 अजूनही बेपत्ताच. साल 2019 मध्ये 88 बेपत्ता आल्याची नोंद झाली आहे तर 14 अजूनही बेपत्ता आहेत. गतवर्षी 2020 मध्ये गायब झालेल्या लोकांची संख्या 38 आहे तर 20 जण अजूनही बेपत्ताच आहेत असे शिर्डीच्या पोलीस रेकॉर्डमध्ये आढळून आले आहे.  

गेल्या 3 वर्षात तब्बल 279 जण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. यातील 67 जणांचा अजूनही तपास लागलेला नाही. अनेकजण तक्रार दाखल करतात, मात्र हरवलेली व्यक्ती घरी पोहचल्यानंतरही पोलिसांना कळवत नसल्याचं तपास अधिकारी दिपक गंधाले यांनी सांगितले आहे.

गेल्या तीन वर्षांतील संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयाने मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधिक्षकांना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले आहे की, मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केला आहे, अशी माहिती दिपक गंधाले यांनी दिली.

शिर्डीत दररोज लाखो साईभक्त साई दर्शनासाठी येतात. त्यापैकी अनेकजण बेपत्ता होत आहेत. परराज्यातील महिला आणि अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत अखेर ही माणसे गेली कुठे? ती घरी परतणार की नाही? किती दिवस घरचे शोधाशोध करणार? यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

(The Was First Published on The Lokmat Written by Sachin Salve)