Home | राजनीती | ड्रग्स व्यवहारात गुंतलेला “तो” राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे

ड्रग्स व्यवहारात गुंतलेला “तो” राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे

Atmaram Panjikar and Satish Dhond

भाजपने लोकांना इतका गृहीत धरले आहे कि त्यांना पूर्ण विश्वास आहे कि काहीही सांगितले तरी लोक त्याला सत्य मानून घेणार आणि असच काहीतरी या बाबतीतही घडलेले दिसतंय. ज्या भाजपने ऑपोसिशन मध्ये असताना अहोरात्र ‘त्या’ रॉय नाईक विरुध बोंबाबोंब केली तेच भाजपचे नेते आता “त्या” रॉय नाईकला “तो” हा नव्हेच आसे सांगत भाजपमध्ये प्रवेश दिला. काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी “तो” राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे असे आव्हाहन केले.      

स्व. मनोहर पर्रिकर हे विरोधी पक्ष नेते असताना ज्याik  राॅय नाईकांच्या नावे शंख मारत होते, ज्या राॅय नाईकांबद्दल राज्यपालांकडे भाजपने निवेदन सादर केले होते, ज्या राॅय नाईकांच्या कथीत ड्रग्स माफीया संबंधावरुन मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखालील भाजप आमदारानी सहा वेळा विधानसभा कामकाज तहकुब करण्यास सभापतीना भाग पाडले होते, ते राॅय नाईक कोण हे भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यानी जाहिर करावे, अशी मागणी काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. 

रितेश व राॅय नाईक याना भाजपात प्रवेश करुन घेतले. ड्रग्स प्रकरणांत हात असलेला राॅय नाईक हा “तो” नव्हे असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते सत्तेत येण्यापुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कारकिर्दीत  ज्या राॅय नाईकाची चौकशी करा, अशी मागणी करीत होते, तो कोण हे आता भाजप संघटन मंत्री सतीश धोंड यानी गोमंतकीयांना सांगणे महत्वाचे ठरले आहे. 

फोंडा तालुक्यातील बोरी गावात काल तिन कामगारांना दुर्देवी मृत्यु आला, परंतु, या घटनेचे भान न ठेवता संघटनमंत्री सतीश धोंड यांनी  नाईक बंधुना भाजपात प्रवेश करुन घेण्याचा सोहळा घडवुन आणला.

पडद्यामागे राहुन सर्व सुत्रे हलविणाऱ्या व “सुपर सिएम” बनुन प्रशासनाच्या सर्व फाईल्स हाताळताना “तो मी नव्हेच” अशा थाटात वावरणाऱ्याना गोमंतकीय जनता आता पुर्णपणे ओळखली आहे. 

गोवा राज्याचे हित सांभाळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यानी ड्रग्स व्यवहारात हात असलेला,  तो राॅय नाईक कोण हे जनतेसमोर आणण्याची मागणी संघटन मंत्री सतीश धोंड यांच्याकडे करावी,  असे अमरनाथ पणजीकर यानी आवाहन केले आहे.

Scroll to Top