Home | राजनीती | काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव – गिरीेश चोडणकर

काबो राजनिवासाचे कॅसिनो, स्पा रिसोर्ट करण्याचा डाॅ. प्रमोद सावंताचा डाव – गिरीेश चोडणकर

Cabo Raj Bhavan Goa

काबो राज निवासाचे खासगीकरण करुन तेथे कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरु करण्याचा डाॅ. प्रमोद सावंतांचा डाव असुन, त्यामुळेच त्यानी  नविन राजभवन बांधण्याचा सरकारी प्रस्ताव पुढे केला आहे, असा दावा गोवा प्रदेश काॅंग्रेस समिती अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला आहे.

कोविड संकट काळात केवळ आपली तिजोरी भरण्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष असुन, राजभवनच्या वास्तुत कॅसिनो स्पा रिसोर्ट सुरू करुन ती  ऐतिहासिक वास्तु  खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव डाॅ. प्रमोद सावंतानी तयार केला आहे, असे गिरीश चोडणकर यानी म्हटले आहे.

कोळसा व खाण व्यवसायात त्यांचे थेट हितसबंध गुंतलेले असल्याने मोले अभयारण्यात लाखो झाडांची कत्तल करुन येणाऱ्या प्रकल्पांबद्दल  मुख्यमंत्री  काहिच बोलत नाहीत असे गिरीश चोडणकर यानी म्हटले आहे. रेल्वे रुळांचे दुपदरीकरण करुन आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी मुख्यमंत्री गोव्याचे पर्यावरण नष्ट करण्यास पुढे सरसावले आहेत हे दुर्देवी आहे.

गोवा विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही हे मान्य करणारे मुख्यमंत्री करोडो रुपये खर्च करुन नविन प्रकल्प बांधण्याचे व काही प्रकल्पांचे नुतनिकरण करण्याच्या घोषणा करीत आहेत. केवळ सल्लागार व कंत्राटदारांकडुन कमिशनसाठी गरज नसताना हे प्रकल्प राबवले जाणार आहेत

असंवेदनशील भाजप सरकारकडे दयानंद सामाजीक सुरक्षा योजना, विधवा व दिव्यांग यांचे मासीक पेंशन देण्यासाठी निधी नाही परंतु स्व. मनोहर पर्रिकरांचे थडगे बांधण्यासाठी सरकार १५ कोटींचा चुराडा करीत आहे.

Scroll to Top